Adjective Phrase in English Grammar

Adjective Phrase (ऍड्जेक्टिव्ह फ्रेज) म्हणजे अर्थपूर्ण विशेषणवाचक शब्दसमूह किंवा विशेषणवाचक वाक्यांश होय.

इंग्रजी वाक्यामध्ये Adjective म्हणून वापरल्या जाणाऱ्या Phrase ला Adjective Phrase असे म्हणतात.

जेव्हा एखादे Adjective वाक्यात वापरले जाते, तेव्हा त्याचा उद्देश त्या वाक्यात वापरलेल्या एखाद्या Noun किंवा Pronoun बद्दल अधिक माहिती सांगणे आणि त्याला अर्थपूर्ण स्वरूप प्राप्त करून देणे हा असतो.

अशी माहिती देणारे Adjective हे एखाद्या Adjective Phrase च्या स्वरूपातसुद्धा असू शकते.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • तुझ्या हातात असलेली पुस्तके तू खाली ठेवू शकतोस.
  • You can put down the books in your hands.

वरील वाक्यामध्ये books या noun विषयी अधिक माहिती सांगण्यासाठी in your hands या phrase चा उपयोग केलेला आहे.

या वाक्यामध्ये in your hands हा संपूर्ण शब्दसमूह एखाद्या Adjective चे काम करत असल्यामुळे त्याला Adjective Phrase असे म्हणतात.

Example 2
  • पिवळ्या रंगाची साडी नेसलेली ती मुलगी माझी बहिण आहे.
  • The girl in the yellow saree is my sister.

वरील वाक्यामध्ये girl या noun विषयी अधिक माहिती सांगण्यासाठी in the yellow saree या phrase चा उपयोग केलेला आहे.

या वाक्यामध्ये in the yellow saree हा संपूर्ण शब्दसमूह एखाद्या Adjective चे काम करत असल्यामुळे त्याला Adjective Phrase असे म्हणतात.

Example 3
  • फडताळावरच्या शेवटच्या कप्प्यात आईने मिठाई ठेवली आहे.
  • Mother has kept the sweets in the last compartment on the shelf.

वरील वाक्यामध्ये compartment या noun विषयी अधिक माहिती सांगण्यासाठी on the shelf या phrase चा उपयोग केलेला आहे.

या वाक्यामध्ये on the shelf हा संपूर्ण शब्दसमूह एखाद्या Adjective चे काम करत असल्यामुळे त्याला Adjective Phrase असे म्हणतात.

Example 4
  • टेबलवरचा दिवा लागत नाहीये.
  • The lamp on the table is not working.

वरील वाक्यामध्ये compartment या noun विषयी अधिक माहिती सांगण्यासाठी on the table या phrase चा उपयोग केलेला आहे.

या वाक्यामध्ये on the table हा संपूर्ण शब्दसमूह एखाद्या Adjective चे काम करत असल्यामुळे त्याला Adjective Phrase असे म्हणतात.

This article has been first posted on and last updated on by