Compound Preposition “after”

after (आफ्टर) हे एक Compound Preposition आहे.

इंग्रजी व्याकरणामध्ये after चा उपयोग Adjective, Adverb, Conjunction किंवा Preposition यांपैकी एका प्रकारे करता येतो.

Compound Preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये after चा उपयोग पुढीलपैकी एखादा अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

after = नंतर (एखादी वेळ, काळ किंवा घटनेनंतर)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • He skips his lunch after a heavy breakfast.
  • सकाळच्या जड न्याहारीनंतर तो दुपारचे जेवण घेण्याचे टाळतो.
Example 2
  • She can leave office after two o'clock in the afternoon.
  • दुपारी दोन वाजल्यानंतर ती कार्यालयामधून निघू शकते.

after = मागे (मागोमाग, पाठीमागे)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • His dog trotted after him.
  • त्याचा कुत्रा त्याच्यामागे दुडूदुडू धावत गेला.
Example 2
  • The police was after him.
  • पोलीस त्याच्यामागे होते.

मागे / मागोमाग या अर्थी जेव्हा after चा उपयोग वाक्यामध्ये केलेला असतो, तेव्हा after दोन अर्थांनी वापरता येते.

एखादी व्यक्ती किंवा वस्तूच्या मागे येणे अशा अर्थाने after चा उपयोग वाक्यामध्ये केलेला असतो, तेव्हा वाक्याचा Subject हा त्या वस्तूच्या अथवा व्यक्तीच्या मागे मनात कुठलाही हेतू न ठेवता जात असतो.

एखादी व्यक्ती किंवा वस्तूच्या मागे असणे अशा अर्थाने after चा उपयोग वाक्यामध्ये केलेला असतो, तेव्हा वाक्याचा Subject हा त्या वस्तूच्या अथवा व्यक्तीच्या मागे मनात एखादा विशिष्ट हेतू ठेवून त्यांचा पाठलाग करत असतो.

This article has been first posted on and last updated on by