नियम १

To च्या Verb ला शेवटी ing प्रत्यय लावून जो नवीन शब्द तयार होतो त्याला एकतर Present Participle (वर्तमानकालवाचक धातुसाधित) किंवा Gerund (धातुसाधित नाम / कृदंत) यांपैकी एक संज्ञा दिली जाते.

नियम २

जेव्हा To चे Verb + ing हा शब्द एखाद्या Transitive (सकर्मक) Main Verb ला जोडून वापरलेला असतो, तेव्हा त्याला Gerund (धातुसाधित नाम / कृदंत) असे म्हणतात.

नियम ३

सामान्यतः Gerund हे वाक्यातील To च्या Verb नंतर जोडून तिसऱ्या स्थानी वापरतात किंवा Gerund नेच वाक्याची सुरूवात केली जाते.

नियम ४

Gerund जेव्हा वाक्याच्या सुरूवातीला येते, तेव्हा ते Subject म्हणून कार्य करते आणि जेव्हा ते वाक्याच्या तिसऱ्या स्थानी येते, तेव्हा ते Object म्हणून कार्य करते.

नियम ५

Gerund हे प्रत्यक्षात To चे Verb असल्यामुळे ते Transitive (सकर्मक) किंवा Intransitive (अकर्मक) असू शकते.

Transitive (सकर्मक) असल्यास त्याला स्वतःचे Object आणि Extension असू शकते.

नियम ६

Gerund + Object + Extension या शब्दसमूहाला Noun Phrase असे म्हणतात.

नियम ७

Noun Phrase as Subject

Gerund ने सुरू झालेली Noun Phrase जर वाक्याच्या सुरूवातीला वापरलेली असेल, तर Noun Phrase च्या संपूर्ण शब्दसमूहाला त्या वाक्याचा Subject समजावे.

For example (उदाहरणार्थ):
 • Waking up early in the morning is very good for health.
 • सकाळी लवकर उठणे हे प्रकृतीसाठी फार चांगले असते.

वरील वाक्यामध्ये Waking up early in the morning ही Noun Phrase वाक्याच्या सुरूवातीला वाक्याचा Subject म्हणून वापरण्यात आली आहे.

नियम ८

Noun Phrase as Object

Gerund ने सुरू झालेली Noun Phrase जर वाक्याच्या तिसऱ्या स्थानी वापरलेली असेल, तर Noun Phrase च्या संपूर्ण शब्दसमूहाला त्या वाक्याचे Object समजावे.

For example (उदाहरणार्थ):
 • Yesterday I had decided waking up early in the morning.
 • सकाळी लवकर उठण्याचे मी काल ठरवले होते.

वरील वाक्यामध्ये waking up early in the morning ही Noun Phrase वाक्याच्या तिसऱ्या स्थानी वाक्याचे Object म्हणून वापरण्यात आली आहे.

Examples (उदाहरणार्थ)
 • सुंदर अक्षरात पत्र लिहिणे ही एक कला आहे.
 • Writing a letter in a good handwriting is an art.
 • माझ्या आईला पंढरपूरला जाण्याची इच्छा होती.
 • My mother wished going to Pandharpur.
 • धुम्रपान करणे हे प्रकृतीसाठी घातक आहे.
 • Smoking is harmful for health.
 • प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेत उत्तीर्ण होण्याची आशा असते.
 • Every student wishes passing in the examination.
 • रोज नदीत पोहणे एक चांगला व्यायाम आहे.
 • Swimming in the river everyday is a good exercise.

This article has been first posted on and last updated on by