Introduction to Infinitive


क्रियापदाचे मूळरूप


नियम १

ज्या शब्दाने काही ना काही क्रिया सूचित होते, अशा शब्दाला To चे Verb असे म्हणतात.

नियम २

जेव्हा असा क्रियादर्शक शब्द to सोबत लिहिला जातो, तेव्हा त्या क्रियादर्शक शब्दाला Infinitive किंवा Infinite Verb असे म्हणतात.

नियम ३

Infinitive / Infinite Verb याचा मराठी अर्थ क्रियापदाचे मूळरूप असा आहे.

नियम ४

इंग्रजी वाक्याच्या दुसऱ्या स्थानी वापरले जाणारे To चे Verb हे नेहमी to काढून वापरले जाते आणि त्याला main verb किंवा finite verb असे म्हणतात.

नियम ५

Infinitive प्रत्यक्षात क्रियादर्शक शब्द असल्यामुळे ते transitive (सकर्मक) असू शकते.

Transitive (सकर्मक) असल्यास त्याला स्वतःचे Object आणि Extension असू शकते.

नियम ६

Infinitive + Object + Extension या शब्दसमूहाला Noun Phrase असे म्हणतात.

नियम ७

वाक्याच्या दुसऱ्या स्थानी जो Subject (कर्ता) असतो, तो दुसऱ्या स्थानातील finite verb ने सूचित होणारी क्रिया करत असतो. ही क्रिया करण्याचा Subject चा काही हेतू असतो.

Infinitive च्या रचनेने हा हेतू व्यक्त करता येतो.

नियम ८

मराठी वाक्यातील क्रियापदाने सूचित होणाऱ्या क्रियेला कोण हा प्रश्न विचारला कि वाक्याचा Subject कळतो.

मराठी वाक्यातील क्रियापदाने सूचित होणाऱ्या क्रियेला काय / कोणाला यांपैकी प्रश्न विचारला कि वाक्याचा Object कळतो.

नियम ९

मराठी वाक्यातील ज्या क्रियापदाला चा / ची / चे / च्या किंवा / ला किंवा साठी / करीता यांपैकी प्रत्यय लावलेला असतो, त्या क्रियापदाला infinitive असे म्हणतात.

नियम १०

ज्याप्रमाणे finite verb ला वाक्यात दुसरे स्थान असते, त्याप्रमाणे infinitive ला मात्र वाक्यात निश्चित कोणतेही स्थान नसते.

Infinitive ची रचना करताना ते एकतर finite verb ला जोडून वापरतात किंवा finite verb पासून दूर अंतरावर वापरतात.

नियम ११

ज्या infinitive ला चा / ची / चे / च्या किंवा / ला यांपैकी प्रत्यय लावलेला असतो, ते नेहमी finite verb ला जोडून वापरावे.

ज्या infinitive ला साठी / करीता यांपैकी प्रत्यय लावलेला असतो, ते नेहमी finite verb ला जोडून न वापरता त्यापासून दूर अंतरावर वापरावे.

Examples (उदाहरणार्थ)
  • मला या परीक्षेत कमीत कमी नव्वद टक्के गुण मिळवण्याची आशा आहे.
  • I hope to get minimum 90% marks in the examination.
  • नदीत पोहायला शिकायचे असे सुरेशने ठरवले आहे.
  • Suresh has decided to learn to swim in the river.
  • सरकारने लोकांना सुरक्षितपणे चालण्यासाठी पादचारी पूल बांधला आहे.
  • Government has built the skywalk for people to walk safely.

This article has been posted on and last updated on by