Modal Auxiliary Verb म्हणजे काय?

Modal Auxiliary Verb (मोडल ऑक्झिलियरी व्हर्ब) म्हणजे सहाय्यक क्रियापद होय.

आपल्या संभाषणात कधीकधी आपल्याला मनातील काही भाव व्यक्त करायचा असतो.

आपल्या मनातील असा भाव व्यक्त करण्यासाठी Modal Auxiliary Verb सहाय्य करते. त्यामुळे त्याला सहाय्यक क्रियापद असे म्हणतात.

Modal Auxiliary Verbs ना Modal Auxiliaries (मोडल ऑक्झिलियरीज) असेही म्हटले जाते.

इंग्रजी व्याकरणातील Modal Auxiliary Verbs पुढीलप्रमाणे आहेत.

can आणि cannot

can आणि cannot चा उपयोग शारीरिक किंवा बौद्धिक क्षमता व्यक्त करण्यासाठी केला जातो.

Read more about “can”

Read more about “cannot”

must

must चा उपयोग गरज, बंधन, कर्तव्य, निश्चय, खात्री आणि अनिवार्यता यांपैकी एखादा भाव व्यक्त करण्यासाठी केला जातो.

Read more about “must”

may

may चा उपयोग आज्ञा, परवानगी, शक्यता, सदिच्छा आणि हेतू यांपैकी एखादा भाव व्यक्त करण्यासाठी केला जातो.

Read more about “may”

should

should चा उपयोग कर्तव्य आणि नैतिक बंधन यांपैकी एखादा भाव व्यक्त करण्यासाठी केला जातो.

Read more about “should”

ought

ought चा उपयोग नैतिक कर्तव्य आणि नैतिक बंधन यांपैकी एखादा भाव व्यक्त करण्यासाठी केला जातो.

Read more about “ought to”

This article has been first posted on and last updated on by