breed

इंग्रजी व्याकरणामध्ये breed (ब्रीड) चा उपयोग To चे Verb आणि Noun यांपैकी एका प्रकारे करण्यात येतो.

breed चा उपयोग To चे Verb म्हणून करताना ते पुढीलपैकी एका अर्थाने वापरलेले असते –

 • पिलू होणे
 • प्रजनन करणे
 • तयार करणे
 • कारणीभूत होणे
 • पशुपालन करणे
breed ची तीन रूपे
पहिले रूप दुसरे रूप तिसरे रूप
Present Tense
(वर्तमानकाळ)
Past Tense
(भूतकाळ)
Past Participle
(भूतकालवाचक धातुसाधित)
breed
(ब्रीड)
bred
(ब्रेड)
bred
(ब्रेड)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
 • Bollywood breeds stars.
 • बॉलीवूड मध्ये उत्तम नट (तारे आणि तारका) तयार होतात.
Example 2
 • Selfishness breeds ruthlessness.
 • स्वार्थीपणा हा क्रूरपणा निर्माण होण्यास कारणीभूत होतो.
Example 3
 • He is breeding cattle to earn income.
 • उत्पन्न मिळवण्यासाठी तो पशुपालन करीत आहे.
Example 4
 • Discontent is bred by rumours.
 • अफवा या असंतोषाला कारणीभूत होतात.
Example 5
 • Most birds breed in spring.
 • बहुतेक पक्षी वसंत ऋतूमध्ये प्रजनन करतात.

This article has been first posted on and last updated on by