Adjective म्हणजे काय?

Noun किंवा Pronoun बद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला Adjective (ऍड्जेक्टिव्ह) म्हणजेच विशेषण असे म्हणतात.

नियम १

जेव्हा एखादे Adjective वाक्यात वापरले जाते, तेव्हा त्याचा उद्देश त्या वाक्यात वापरलेल्या एखाद्या Noun किंवा Pronoun बद्दल अधिक माहिती सांगणे आणि त्याला अर्थपूर्ण स्वरूप प्राप्त करून देणे हा असतो.

उदाहरणार्थ –
  • Sachin Tendulkar is a great player.
  • सचिन तेंडूलकर एक महान खेळाडू आहे.

वरील वाक्यामध्ये player या Noun ची अधिक माहिती देण्यासाठी great हे Adjective वापरलेले आहे.

नियम २

वाक्यामध्ये वापरलेल्या Adjective चा Noun किंवा Pronoun शी असलेला संबंध हा एकतर Direct (प्रत्यक्ष) असतो किंवा Indirect (अप्रत्यक्ष) असतो.

नियम ३
Direct / Attributive Use (प्रत्यक्ष संबंध)

जेव्हा एखादे Adjective एखाद्या Noun किंवा Pronoun सोबत त्याला जोडून वापरले जाते, तेव्हा त्या Adjective चा त्या Noun / Pronoun शी Direct (डायरेक्ट) म्हणजेच प्रत्यक्ष संबंध येतो.

अशा संबंधाला Attributive Use (ऍट्रिब्युटिव्ह युज्) असेही म्हटले जाते.

उदाहरणार्थ –
  • She is an honest girl.
  • ती एक प्रामाणिक मुलगी आहे.

वरील वाक्यामध्ये girl या Noun ची अधिक माहिती देण्यासाठी honest हे Adjective वापरलेले असून त्यांचा एकमेकांशी Direct संबंध आहे.

नियम ४
Indirect / Predicative Use (अप्रत्यक्ष संबंध)

जेव्हा एखादे Adjective एखाद्या Noun किंवा Pronoun पासून दूर अंतरावर वापरले जाते, तेव्हा त्या Adjective चा त्या Noun / Pronoun शी Indirect (इनडायरेक्ट) म्हणजेच अप्रत्यक्ष संबंध येतो.

अशा संबंधाला Predicative Use (प्रेडिकेटिव्ह युज्) असेही म्हटले जाते.

उदाहरणार्थ –
  • She is honest.
  • ती प्रामाणिक आहे.

वरील वाक्यामध्ये She या Pronoun ची अधिक माहिती देण्यासाठी honest हे Adjective वापरलेले असून त्यांचा एकमेकांशी Indirect संबंध आहे.

मात्र, हे Adjective वाक्यामध्ये Pronoun ला जोडून न वापरता त्यापासून दूर अंतरावर वापरले आहे.

Adjectives ची विभागणी पुढे दिल्याप्रमाणे एकूण आठ प्रकारांमध्ये केलेली आहे.

Proper Adjective

Proper Adjective (प्रॉपर ऍड्जेक्टिव्ह) म्हणजे विशेषनामापासून तयार होणारे विशेषण होय.

Proper Adjective मध्ये Proper Noun चा म्हणजेच विशेषनामाचा उपयोग विशेषण म्हणून केला जातो.

Read more about Proper Noun
Adjective of Quality

Adjective of Quality (ऍड्जेक्टिव्ह ऑफ क्वॉलिटी) म्हणजे गुणदर्शक विशेषण होय.

एखाद्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या Quality चे म्हणजेच गुणाचे वर्णन या Adjective of Quality मुळे करता येते.

Read more about Adjective of Quality
Adjective of Number

Adjective of Number (ऍड्जेक्टिव्ह ऑफ नंबर) म्हणजे संख्यादर्शक विशेषण होय.

Adjective of Number मध्ये संख्यादर्शक नामाचा उपयोग विशेषण म्हणून केला जातो..

Read more about Adjective of Number
Adjective of Quantity

Adjective of Quantity (ऍड्जेक्टिव्ह ऑफ क्वॉन्टिटी) म्हणजे परिमाणदर्शक विशेषण होय.

संख्येने मोजता न येणाऱ्या नामासोबत Adjective of Quantity वापरले जाते.

Read more about Adjective of Quantity
Demonstrative Adjective

Demonstrative Adjective (डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍड्जेक्टिव्ह) म्हणजे दर्शक विशेषण होय.

जाणीवपूर्वक एखादी व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी Demonstrative Adjective वापरले जाते.

Read more about Demonstrative Adjective
Possessive Adjective

Possessive Adjective (पझेसिव्ह ऍड्जेक्टिव्ह) म्हणजे षष्ठी विभक्तीचे विशेषण होय.

एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूबद्दल Possession म्हणजेच स्वामित्व दर्शविण्यासाठी Possessive Adjective चा उपयोग केला जातो.

Read more about Possessive Adjective
Distributive Adjective

Distributive Adjective (डिस्ट्रिब्युटिव्ह ऍड्जेक्टिव्ह) म्हणजे वितरणदर्शक विशेषण होय.

एखाद्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा उल्लेख एकमेवपणे किंवा स्वतंत्रपणे करण्यासाठी Distributive Adjective चा उपयोग केला जातो.

Read more about Distributive Adjective
Interrogative Adjective

Interrogative Adjective (इंटरॉगेटिव्ह ऍड्जेक्टिव्ह) म्हणजे प्रश्नार्थक विशेषण होय.

एखाद्या प्रश्नार्थक वाक्यामध्ये Interrogative Adjective चा उपयोग केला जातो.

Read more about Interrogative Adjective

This article has been first posted on and last updated on by