Adverb of Place


स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययAdverb of Place

Adverb of Place (ऍड्व्हर्ब ऑफ प्लेस) म्हणजे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय होय.

वाक्यातील घडत असलेली क्रिया कुठे घडत आहे, याविषयी अधिक माहिती देण्यासाठी Adverb of Place चा उपयोग केला जातो.

“Where” ने सुरू होणारा प्रश्न

वाक्याचा Subject हा वाक्यातील Verb ने सूचित होणारी क्रिया कुठे  करत आहे, हे दर्शविण्यासाठी Adverb of Place चा उपयोग केला जातो.

Where (व्हेयर्) ने सुरू होणाऱ्या प्रश्नाचे उत्तर हे Adverb of Place शी संबंधित असते.

For example (उदाहरणार्थ),
 • त्याने त्याचे पुस्तक तेथे ठेवले आहे.
 • He has kept his book there.

वरील वाक्यामध्ये there हे Adverb of Place वापरलेले आहे.

या वाक्याला Where did he keep his book? असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर there असे येते.

इंग्रजी व्याकरणातील काही Adverbs of Place

Adverbs of Place मध्ये समाविष्ट असलेले काही Adverbs पुढे दिल्याप्रमाणे आहेत.

Adverb of Place
(स्थलवाचक क्रियाविशेषण)
Meaning
(मराठी अर्थ)
here
(हीयर्)
येथे
there
(देयर्)
तेथे
inside
(इनसाईड)
आतमध्ये
outside
(आऊटसाईड)
बाहेर
near
(नीयर्)
जवळ
far
(फार)
लांब
everywhere
(एव्हरीव्हेयर्)
सर्वत्र
nowhere
(नोव्हेयर्)
कोठेही नाही
For example (उदाहरणार्थ),
Example 1
 • राधा येथे बसेल.
 • Radha will sit here.
Example 2
 • मुले बाहेर खेळत होती.
 • Children were playing outside.
Example 3
 • जंगल सर्वत्र समान दिसते.
 • The jungle looks the same everywhere.
Example 4
 • उन्हाळ्याच्या सुट्ट्या जवळ येत आहेत.
 • The summer holidays are drawing near.
Example 5
 • आतमध्ये खूप उबदार आहे.
 • It is very warm inside.

This article has been first posted on and last updated on by