Interrogative Adverb


प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्ययInterrogative Adverb

Interrogative Adverb (इंटरॉगेटिव्ह ऍड्व्हर्ब) म्हणजे प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय होय.

Interrogative Adverb चा उपयोग वाक्यात घडत असलेल्या क्रियेविषयी प्रश्न विचारण्याकरिता केला जातो.

Interrogative Adverb चा उपयोग नेहमी वाक्याच्या सुरूवातीला केला जातो.

Interrogative Adverb ने सुरु होणारे वाक्य हे नेहमी Interrogative Sentence (इंटरॉगेटिव्ह सेन्टेन्स) म्हणजे प्रश्नार्थक वाक्य असते.

इंग्रजी व्याकरणातील काही Interrogative Adverbs

Interrogative Adverbs मध्ये समाविष्ट असलेले काही Adverbs पुढे दिल्याप्रमाणे आहेत.

Interrogative Adverbs
(प्रश्नार्थक क्रियाविशेषण)
Meaning
(मराठी अर्थ)
Where
(व्हेअर)
कुठे, कोणत्या ठिकाणी
When
(व्हेन)
कधी, कोणत्या वेळी
How
(हाऊ)
कसे, कशा रीतीने
Why
(व्हाय)
का, कशासाठी, कोणत्या हेतूने
For example (उदाहरणार्थ),
Example 1
 • तो कधी येणार आहे?
 • When will he come?
Example 2
 • तिने ते कसे केले?
 • How did she do it?
Example 3
 • रात्रीच्या जेवणासाठी ते कुठे थांबणार आहेत?
 • Where are they going to stop for dinner?
Example 4
 • एवढे पैसे तुला कशासाठी हवे आहेत?
 • Why do you require so much money?
Example 5
 • तो घरी कधी पोचला?
 • When did he reach home?
Example 6
 • तो तिच्यासोबत कसा वागत आहे?
 • How is he behaving with her?

This article has been first posted on and last updated on by