Accusative or Dative Case


द्वितीया / चतुर्थी विभक्तीAccusative Case or Dative Case

Accusative Case (ऍक्युझेटीव्ह केस) किंवा Dative Case (डेटिव्ह केस) म्हणजे द्वितीया किंवा चतुर्थी विभक्ती होय.

इंग्रजी व्याकरणामध्ये वाक्यातील Object हे नेहमी Accusative Case चे किंवा Dative Case चे समजले जाते.

म्हणजेच, वाक्यातील एखादे Noun किंवा Pronoun जेव्हा वाक्यामध्ये Object म्हणून वापरलेले असते, तेव्हा ते नेहमी Accusative Case चे किंवा Dative Case चे समजावे.

Accusative Case चे Object

इंग्रजी व्याकरणामध्ये वाक्यातील क्रियापदाचे Object हे जेव्हा Direct Object म्हणून वापरलेले असते, तेव्हा ते नेहमी Accusative Case चे समजावे.

तसेच, वाक्यातील एखाद्या Preposition ला जोडून वापरलेले Object सुद्धा नेहमी Accusative Case चे समजले जाते.

Dative Case चे Object

इंग्रजी व्याकरणामध्ये वाक्यातील क्रियापदाचे Object हे जेव्हा Indirect Object म्हणून वापरलेले असते, तेव्हा ते नेहमी Dative Case चे समजावे.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • आई बाजारातून भाज्या घेऊन आली.
  • Mother brought vegetables from the market.

वरील वाक्यामध्ये vegetables हे noun वाक्यातील क्रियापदाचे Direct Object म्हणून वापरलेले असल्यामुळे ते Accusative Case चे समजावे.

तसेच, market हे noun वाक्यातील from या preposition चे Object म्हणून वापरलेले असल्यामुळे ते Accusative Case चे समजावे.

Example 2
  • त्याने त्यांना पैसे दिले.
  • He gave them money.

वरील वाक्यामध्ये them हे pronoun वाक्यातील क्रियापदाचे Indirect Object म्हणून वापरलेले असल्यामुळे ते Dative Case चे समजावे.

तसेच, money हे noun वाक्यातील क्रियापदाचे Direct Object म्हणून वापरलेले असल्यामुळे ते Accusative Case चे समजावे.

Example 3
  • ते रोज क्रिकेट खेळतात.
  • They play cricket everyday.

वरील वाक्यामध्ये cricket हे noun वाक्यातील क्रियापदाचे Direct Object म्हणून वापरलेले असल्यामुळे ते Accusative Case चे समजावे.

Example 4
  • त्याने तिला नवीन सायकल आणली.
  • He brought her a new cycle.

वरील वाक्यामध्ये her हे pronoun वाक्यातील क्रियापदाचे Indirect Object म्हणून वापरलेले असल्यामुळे ते Dative Case चे समजावे.

तसेच, cycle हे noun वाक्यातील क्रियापदाचे Direct Object म्हणून वापरलेले असल्यामुळे ते Accusative Case चे समजावे.

This article has been first posted on and last updated on by