Gender in English Grammar

इंग्रजी व्याकरणामध्ये एखादी व्यक्ती, वस्तू अथवा प्राणी यांच्या लिंगानुसार त्यांचे वर्गीकरण करण्यासाठी Gender (जेन्डर) म्हणजेच लिंग हि संज्ञा वापरली जाते.

इंग्रजी व्याकरणामध्ये Gender चे पुढीलप्रमाणे एकूण चार भाग आहेत.

Masculine Gender

Masculine Gender (मॅस्क्युलिन् जेन्डर) म्हणजे पुल्लिंग होय.

एखाद्या Noun किंवा Pronoun च्या रूपावरून जर पुरूषजातीचा बोध होत असेल, तर ते Masculine Gender चे समजावे.

For example
(उदाहरणार्थ)
– man, father, brother, bull, he इत्यादी.

Feminine Gender

Feminine Gender (फेमिनाईन् जेन्डर) म्हणजे स्त्रीलिंग होय.

एखाद्या Noun किंवा Pronoun च्या रूपावरून जर स्त्रीजातीचा बोध होत असेल, तर ते Feminine Gender चे समजावे.

For example
(उदाहरणार्थ)
– woman, mother, sister, cow, she इत्यादी.

Neuter Gender

Neuter Gender (न्यूटर जेन्डर) म्हणजे नपुंसकलिंग होय.

एखाद्या Noun किंवा Pronoun च्या रूपावरून जर पुरूषजाती किंवा स्त्रीजाती यांपैकी कोणाचाही बोध होत नसेल, तर ते Neuter Gender चे समजावे.

सामान्यतः कोणतेही Material Noun आणि Abstract Noun हे नेहमी Neuter Gender चे समजले जाते.

For example
(उदाहरणार्थ)
– plate, phone, table, chair, bottle इत्यादी.

Common Gender

Common Gender (कॉमन जेन्डर) म्हणजे पुल्लिंग आणि स्त्रीलिंग असे दोन्हीही होय.

एखाद्या Noun किंवा Pronoun च्या रूपावरून जर पुरूषजाती आणि स्त्रीजाती या दोन्हींचा बोध होत असेल, तर ते Common Gender चे समजावे.

Common Gender चे Noun हे पुरूष आणि स्त्री अशा दोन्हीही व्यक्तींबाबत वापरता येते. त्यामुळे Masculine Gender अथवा Feminine Gender चा उपयोग करताना सारखेच Noun वापरले जाते.

For example
(उदाहरणार्थ),
Common Gender मराठी अर्थ
child मूल
baby मूल
parent आई / वडील
friend मित्र / मैत्रीण
cousin चुलतभाऊ / चुलतबहिण
student विद्यार्थी / विद्यार्थिनी
neighbour शेजारी / शेजारीण
enemy शत्रू
(स्त्री अथवा पुरूष)

वरील सर्व Nouns हि पुरूष आणि स्त्री या दोन्हींसाठी सारखीच आहेत. त्यामुळे त्यांचा समावेश Common Gender मध्ये केला जातो.

Masculine Gender च्या Nouns साठी पर्यायी Feminine Gender ची काही Nouns पुढीलप्रमाणे आहेत.

पर्यायी नवीन शब्दाचा उपयोग करून
Masculine Gender
(पुल्लिंग)
Feminine Gender
(स्त्रीलिंग)
man
(पुरूष)
woman
(स्त्री)
boy
(मुलगा)
girl
(मुलगी)
son
(मुलगा)
daughter
(मुलगी)
father
(वडील)
mother
(आई)
brother
(भाऊ)
sister
(बहीण)
king
(राजा)
queen
(राणी)
husband
(नवरा)
wife
(बायको)
uncle
(काका, मामा)
aunt
(काकी, मामी, मावशी)
bull
(बैल)
cow
(गाय)
horse
(घोडा)
mare
(घोडी)
एखादा शब्द जोडून (prefix, suffix)
Masculine Gender
(पुल्लिंग)
Feminine Gender
(स्त्रीलिंग)
manservant
(पुरूष नोकर)
maidservant
(स्त्री नोकर, मोलकरीण)
he-goat
(बकरा)
she-goat
(बकरी)
cock-sparrow
(चिमणा)
hen-sparrow
(चिमणी)
jack-ass
(नर - गाढव)
she-ass
(मादी - गाढव)
grandfather
(आजोबा)
grandmother
(आजी)
peacock
(मोर)
peahen
(लांडोर)
washerman
(धोबी)
washerwoman
(धोबीण)
ess हा प्रत्यय जोडून (suffix)
Masculine Gender
(पुल्लिंग)
Feminine Gender
(स्त्रीलिंग)
god
(देव)
godess
(देवी)
lion
(सिंह)
lioness
(सिंहीण)
count
(सरदार)
countess
(सरदार-पत्नी)
poet
(कवी)
poetess
(कवयित्री)
actor
(नट)
actress
(नटी)
emperor
(सम्राट)
empress
(सम्राज्ञी)

This article has been first posted on and last updated on by