Material Noun म्हणजे काय?

एखाद्या पदार्थाला ज्या नावाने ओळखले जाते, त्या नावाला Material Noun (मटेरियल नाऊन) म्हणजेच पदार्थवाचक नाम असे म्हणतात.

नियम १

निसर्गामध्ये आढळणाऱ्या मूलभूत घटकांपासून काही पदार्थ नैसर्गिकरीत्या तयार होतात.

अशा नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या पदार्थाच्या नावाला Material Noun असे म्हणतात.

For example (उदाहरणार्थ) – sand, rain, milk, honey, water, air, earth, salt, sunlight इत्यादी.

नियम २

जसे कित्येक पदार्थ निसर्गनिर्मित आहेत, त्याप्रमाणे अनेक पदार्थ हे मानवनिर्मित सुद्धा आहेत.

हे मानवनिर्मित पदार्थ नैसर्गिक पदार्थांचा उपयोग करून मानवाने तयार केलेले आहेत.

अशा मानवनिर्मित पदार्थाच्या नावालासुद्धा Material Noun असे म्हणतात.

For example (उदाहरणार्थ) – chalk, cotton, jute, rubber, silk, cement इत्यादी.

नियम ३

एखादा द्रवपदार्थ किंवा धान्यपदार्थ किंवा खाद्यपदार्थ याच्या नावालासुद्धा Material Noun असे म्हणतात.

For example (उदाहरणार्थ) – coffee, milk, water, tea, rice, wheat, oil, butter, flour, honey, cheese, wine, shampoo इत्यादी.

नियम ४

एखादा धातू, ज्यापासून विविध वस्तू तयार केल्या जातात, त्याच्या नावालासुद्धा Material Noun असे म्हणतात.

For example (उदाहरणार्थ) – gold, silver, copper, iron, calcium इत्यादी.

नियम ५
Uncountable Material Noun

Material Noun ने दर्शविलेल्या वस्तू / पदार्थ संख्येत मोजता येत नाही.

त्यामुळे त्यांना Uncountable (अन्काउंटेबल्) म्हणजेच संख्येत मोजता न येण्यासारखे असेही म्हटले जाते.

असे पदार्थ मोजण्यासाठी लिटर, किलोग्रॅम अशा परिमाणांचा उपयोग करावा लागतो.

For example (उदाहरणार्थ) – १ लिटर दूध, ४ किलो साखर, २ किलो लोणी इत्यादी.

नियम ६
Common Noun आणि Material Noun

कधीकधी एखादे Noun एखाद्या वाक्यात Common Noun आणि Material Noun अशा दोन्ही अर्थांनी वापरता येते.

उदाहरणार्थ –
  1. Fish live in water.
  2. Fish is good for health.

वरील वाक्यांमध्ये fish हे Noun दोन्हीही अर्थांनी वापरले आहे.

पहिल्या वाक्यात fish चा अर्थ एक किंवा अनेक मासे असा असून ते Common Noun म्हणून वापरलेले आहे.

दुसऱ्या वाक्यात fish या शब्दाचा अर्थ मासा नावाचा एक पदार्थ असा असून तो पदार्थ शरीराला किती उपयुक्त आहे हे सांगण्यात आले आहे. इथे त्याचा उपयोग Material Noun म्हणून करण्यात आला आहे.

This article has been first posted on and last updated on by