Compound Preposition “behind”

behind (बिहाइंड) हे एक Compound Preposition आहे.

इंग्रजी व्याकरणामध्ये behind चा उपयोग Adverb किंवा Preposition यांपैकी एका प्रकारे करता येतो.

Compound Preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये behind चा उपयोग पुढीलपैकी एक अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

behind = मागे, आड (मागील बाजूस)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
 • The moon is behind a cloud.
 • चंद्र ढगाआड (ढगाच्या पाठीमागे) आहे.
Example 2
 • His school is behind the post office.
 • त्याची शाळा पोस्टाच्या पाठीमागे आहे.

behind = मागे, पाठीमागे (समर्थनासाठी किंवा मदतीसाठी)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
 • The whole country was behind him.
 • संपूर्ण देश त्याच्या पाठीमागे होता.
Example 2
 • Don't worry, I am behind you.
 • काळजी करू नका, मी तुमच्या मागे आहे.

behind = मागे (एखाद्या परिस्थितीला कारणीभूत)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
 • Those people were behind his killing.
 • ते लोक त्याच्या हत्येच्या मागे (हत्येस कारणीभूत) होते.
Example 2
 • So many vehicles on the streets are behind the rising levels of pollution.
 • रस्त्यांवरील खूप सारी वाहने प्रदूषणाच्या वाढत्या पातळीला कारणीभूत आहेत.

This article has been first posted on and last updated on by