Compound Preposition “under”

under (अंडर) हे एक Compound Preposition आहे.

इंग्रजी व्याकरणामध्ये under चा उपयोग Adverb किंवा Preposition यांपैकी एका प्रकारे करता येतो.

Compound Preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये under चा उपयोग पुढीलपैकी एक अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

under = खाली

For example (उदाहरणार्थ),
Example 1
 • He has kept his shoes under the table.
 • त्याने त्याचे बूट टेबलाखाली ठेवलेले आहेत.
Example 2
 • They were sitting under the tree.
 • ते झाडाखाली बसले होते.

under = पेक्षा कमी

For example (उदाहरणार्थ),
Example 1
 • Both his children are under five years of age.
 • त्याची दोन्हीही मुलं पाच वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत.
Example 2
 • The distance from my house to the railway station is under three kilometres.
 • माझ्या घरापासून रेल्वेस्थानकापर्यंतचे अंतर तीन किलोमीटरपेक्षा कमी आहे.

under = एखाद्या परिस्थितीत

For example (उदाहरणार्थ),
Example 1
 • We would never have met under normal circumstances.
 • आपण सामान्य परिस्थितीमध्ये कधीच भेटलो नसतो.
Example 2
 • This is not possible under the current law.
 • हे होणे सध्याच्या कायद्याच्या अखत्यारीत शक्य नाहीये.

This article has been first posted on and last updated on by