Compound Preposition “within”

within (विदिन्) हे एक Compound Preposition आहे.

इंग्रजी व्याकरणामध्ये within चा उपयोग Adverb किंवा Preposition यांपैकी एका प्रकारे करता येतो.

Compound Preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये within चा उपयोग पुढीलपैकी एक अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

within = आत, आतील बाजूस

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • He has sent a notice to all the employees within his department.
  • त्याने त्याच्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना आगाऊ सूचना पाठवलेली आहे.
Example 2
  • He has parked his car within the compound.
  • त्याने त्याची गाडी आवाराच्या आत (कुंपणाच्या आतील बाजूस) लावली आहे.

within = एखाद्या मर्यादेच्या आत (काळ, अंतर)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • He will reach home within an hour.
  • तो एका तासात घरी पोहोचेल.
Example 2
  • There is no restaurant within three kilometres from my home.
  • माझ्या घरापासून तीन किलोमीटरच्या अंतरामध्ये कोणतेही भोजनालय नाही आहे.

This article has been first posted on and last updated on by