Simple Preposition “near”

near (निअ) हे एक Simple Preposition आहे.

इंग्रजी व्याकरणामध्ये near चा उपयोग Adjective, To चे Verb, Adverb किंवा Preposition यांपैकी एका प्रकारे करता येतो.

Simple Preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये near चा उपयोग पुढील अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

near = जवळ, पाशी, बाजूला, शेजारी

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • My school is near the lake.
  • माझी शाळा तळ्याच्या शेजारी (तळ्यापाशी) आहे.
Example 2
  • He stopped the car near the shop.
  • त्याने दुकानाशेजारी गाडी थांबवली.

near आणि near to मधील फरक

near आणि near to या दोन्हींचा अर्थ जवळजवळ सारखाच आहे.

फरक फक्त इतकाच आहे की जवळची स्थिती  दाखवताना near  वापरले जाते. तर, जवळ येण्याची गती  दर्शविण्यासाठी near to चा उपयोग केला जातो.

एखादा दिवस, एखादा क्षण, एखादा सण इत्यादी जवळ येत आहेत, असा अर्थ दर्शविण्यासाठी प्रामुख्याने near to चा उपयोग केला जातो.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • It is getting near to Diwali.
  • दिवाळीचा सण जवळ येत आहे.
Example 2
  • Her mother was near to tears.
  • तिची आई रडण्याच्या बेतात होती.

This article has been first posted on and last updated on by