Subject having Infinitive


वाक्याच्या कर्त्यामध्ये मूळरूपाचा उपयोग



नियम १

कधीकधी इंग्रजी वाक्याची सुरूवात Infinitive ने केलेली असते आणि त्याचा उपयोग त्या वाक्याच्या Subject ची रचना करण्यासाठी केलेला असतो.

नियम २

अशाप्रकारे जेव्हा इंग्रजी वाक्याची सुरूवात एखाद्या Infinitive ने केलेली असते, तेव्हा Infinitive पासून Main Verb पर्यंतच्या संपूर्ण शब्दसमूहाला Noun Phrase असे म्हणतात.

नियम ३
Infinitive ने सुरू झालेल्या वाक्यातील Main Verb

Infinitive ने सुरू झालेल्या Noun Phrase नंतर वाक्यातील Main Verb म्हणून is किंवा was यांपैकी एक To be चे Verb वापरलेले असते.

त्याचप्रमाणे, Main Verb म्हणून become, seem, appear, make यांपैकी एखादे To चे Verb सुद्धा वापरता येते.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • खरे बोलणे हा एक सद्गुण आहे.
  • To speak the truth is a good virtue.
Example 2
  • खोटे बोलणे एक दुर्गुण आहे.
  • To tell a lie is a bad virtue.
Example 3
  • सकाळी लवकर उठणे ही एक चांगली सवय आहे.
  • To wake up early in the morning is a good habit.
Example 4
  • संपत्ती उधळणे ही एक अविचारी कृती आहे.
  • To squander wealth is a thoughtless action.
Example 5
  • वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण होणे कठीण दिसते.
  • To pass the final exam seems difficult.
नियम ४
नकारार्थी वाक्यातील रचना

Infinitive ने सुरू झालेल्या वाक्याची Negative Sense (निगेटिव्ह सेन्स) ची म्हणजे नकारार्थी वाक्याची  रचना करताना वाक्याची सुरूवात Not (नॉट) ने करावी आणि त्याला जोडून वाक्याचा Noun Phrase च्या स्वरूपातील Subject लिहावा.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • मूलभूत संकल्पना न समजल्यामुळे काही विद्यार्थ्यांना गणित कठीण जाते.
  • Not to understand basic concepts makes Mathematics tough for some students.
Example 2
  • सकाळी लवकर न उठणे ही एक वाईट सवय आहे.
  • Not to wake up early in the morning is a bad habit.

This article has been first posted on and last updated on by