Modal Auxiliary Verb “may”

may (मे) हे एक Modal Auxiliary Verb आहे.

आज्ञा, परवानगी, शक्यता, सदिच्छा आणि हेतू यांपैकी एखादा भाव व्यक्त करण्यासाठी may चा उपयोग केला जातो.

नियम १

वाक्यातील Subject च्या Person चा आणि Number चा may वर काहीही परिणाम होत नाही.

त्यामुळे, कोणत्याही Person च्या आणि Number च्या Subject सोबत may चा उपयोग करता येतो.

नियम २
may सोबतचे main verb

may सोबत नेहमी पहिल्या रूपाचे Main Verb वापरले जाते.

may सोबत वापरलेल्या पहिल्या रूपाच्या Main Verb ला खरे पाहता Infinitive असे म्हणतात.

मात्र, हे Infinitive इथे to काढून वापरलेले असल्यामुळे त्याला Plain infinitive (प्लेन इन्फिनिटिव्ह) असेही म्हटले जाते.

जेव्हा आपण may एखाद्या वाक्यात वापरतो, तेव्हा त्या वाक्यातून आपण पुढीलपैकी कोणताही एक भाव व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो.

Permission

Permission (परमिशन) म्हणजे आज्ञा किंवा परवानगी हा भाव व्यक्त करण्यासाठी may चा उपयोग केला जातो.

Read more about “may” showing Permission
Possibility

Possibility (पॉसिबिलिटि) म्हणजे शक्यता हा भाव व्यक्त करण्यासाठी may चा उपयोग केला जातो.

Read more about “may” showing Possibility
Wish

Wish (विश) म्हणजे सदिच्छा हा भाव व्यक्त करण्यासाठी may चा उपयोग केला जातो.

Read more about “may” showing Wish
Purpose

Purpose (पर्पज) म्हणजे हेतू हा भाव व्यक्त करण्यासाठी may चा उपयोग केला जातो.

Read more about “may” showing Purpose

This article has been first posted on and last updated on by