Primary Auxiliary Verb “have”

have (हॅव्) हे एक Primary Auxiliary Verb आहे.

have या क्रियापदाला त्याच्या वाक्यातील उपयोगानुसार To have चे Verb किंवा Primary Auxiliary Verb यांपैकी एक संज्ञा दिली जाते.

नियम १

have हे क्रियापद जेव्हा वाक्यातील Main Verb ला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी सहाय्य करते, तेव्हा त्याला Primary Auxiliary Verb असे म्हणतात.

नियम २

जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये have चा उपयोग Primary Auxiliary Verb म्हणून केलेला असतो, तेव्हा ते वाक्य सामान्यतः Perfect Series किंवा Perfect Continuous Series यांपैकी एका Tense चे असतेे.

नियम ३

Perfect Series मध्ये have ला जोडून एखाद्या Main Verb चे तिसरे रूप म्हणजेच Past Participle वापरले जाते.

Perfect Continuous Series मध्ये मात्र have ला जोडून नेहमी been हेच Past Participle वापरले जाते.

“have” चे स्वरूप Type
(प्रकार)
Where to use
(कुठे वापरावे)
have (हॅव्),
has (हॅज्)
Present Tense
(वर्तमानकाळ)

Present Perfect
(पूर्ण वर्तमानकाळ)

Present Perfect Continuous
(चालू पूर्ण वर्तमानकाळ)

had (हॅड्) Past Tense
(भूतकाळ)

Past Perfect
(पूर्ण भूतकाळ)

Past Perfect Continuous
(चालू पूर्ण भूतकाळ)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • त्याने नवीन चित्रपट पाहिला आहे.
  • He has seen the new movie.

वरील वाक्य Present Perfect Tense चे असून या वाक्यामध्ये has हे Present Tense चे क्रियापद वापरलेले आहे.

has चा उपयोग Auxiliary Verb म्हणून केलेला असून ते to see (पाहणे) या Main Verb ला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी सहाय्य करीत आहे.

Example 2
  • मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पक्षी भारतातून दुसऱ्या उबदार देशांकडे स्थलांतर करीत आहेत.
  • Birds have been migrating from India to warmer countries since the last week of May.

वरील वाक्य Present Perfect Continuous Tense चे असून या वाक्यामध्ये have हे Present Tense चे क्रियापद वापरलेले आहे.

have चा उपयोग Auxiliary Verb म्हणून केलेला असून ते to migrate (स्थलांतर करणे) या Main Verb ला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी सहाय्य करीत आहे.

Example 3
  • दोन दिवसांपूर्वी मी एक फुलदाणी फोडली होती.
  • I had broken a flowerpot two days ago.

वरील वाक्य Past Perfect Tense चे असून या वाक्यामध्ये had हे Past Tense चे क्रियापद वापरलेले आहे.

had चा उपयोग Auxiliary Verb म्हणून केलेला असून ते to break (फोडणे) या Main Verb ला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी सहाय्य करीत आहे.

Example 4
  • शेतकरी सकाळपासून शेतात काम करत होते.
  • Farmers had been working in the field since morning.

वरील वाक्य Past Perfect Continuous Tense चे असून या वाक्यामध्ये had हे Past Tense चे क्रियापद वापरलेले आहे.

had चा उपयोग Auxiliary Verb म्हणून केलेला असून ते to work (काम करणे) या Main Verb ला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी सहाय्य करीत आहे.

This article has been first posted on and last updated on by