to catch

इंग्रजी व्याकरणामध्ये catch (कॅच) चा उपयोग To चे Verb आणि Noun यांपैकी एका प्रकारे करण्यात येतो.

catch चा उपयोग To चे Verb म्हणून करताना ते पुढीलपैकी एका अर्थाने वापरलेले असते –

 • पकडणे, झेलणे (चेंडू, वस्तू इत्यादी)
 • वेळेवर जाऊन पकडणे (बस, गाडी इत्यादी)
 • काहीतरी करत असताना कोणाला पकडणे
 • संसर्ग किंवा संपर्कामुळे मिळविणे (सर्दी, खोकला इत्यादी)
 • समजणे अथवा लक्षात येणे (एखाद्या गोष्टीचा अर्थ)
 • अडकणे अथवा अडकविणे (खिळा, फळी इत्यादी)
 • आदळणे, आपटणे (शरीराचा एखादा अवयव)
catch ची तीन रूपे
पहिले रूप दुसरे रूप तिसरे रूप
Present Tense
(वर्तमानकाळ)
Past Tense
(भूतकाळ)
Past Participle
(भूतकालवाचक धातुसाधित)
catch
(कॅच)
caught
(कॉट)
caught
(कॉट)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
 • He caught the ball very well.
 • त्याने अगदी चांगल्या प्रकारे चेंडू पकडला.
Example 2
 • Radha catches the 9am bus to reach office.
 • राधा कार्यालयात पोचण्यासाठी सकाळी ९ वाजताची बस पकडते.
Example 3
 • Vikram caught him stealing money.
 • विक्रमने त्याला पैसे चोरताना पकडले.
Example 4
 • She caught cold yesterday.
 • तिला काल सर्दी झाली.
Example 5
 • I caught the meaning of his words very late.
 • मला त्याच्या शब्दांचा अर्थ फार उशिरा लक्षात आला.
Example 6
 • A nail caught her dress yesterday.
 • तिच्या कपड्यांमध्ये काल खिळा अडकला.
Example 7
 • The brick caught him on his forehead.
 • वीट त्याच्या डोक्यावर येऊन आदळली.

This article has been first posted on and last updated on by