Past Continuous Tense

Past Continuous Tense (पास्ट कंटिन्यूअस टेन्स) म्हणजे चालू / अपूर्ण भूतकाळ होय.

जेव्हा एखादी क्रिया भूतकाळात सतत परंतु अल्पकाळ चालू असते, तेव्हा अशी होणारी क्रिया व्यक्त करण्यासाठी Past Continuous Tense चा उपयोग करतात.

नियम १

इंग्रजी वाक्यात Subject नंतर वाक्याच्या दुसऱ्या स्थानी जेव्हा was किंवा were यांपैकी एक Auxiliary Verb वापरलेले असते आणि त्याच्यासोबत एखादे Present Participle वापरलेले असते, तेव्हा त्या वाक्याला Past Continuous Tense चे वाक्य असे म्हणतात.

नियम २

जेव्हा मराठी वाक्याच्या अगदी शेवटी होतो / होता / होती / होतास / होतीस / होतात / होत्या  यांपैकी एखादे क्रियापद वापरलेले असते आणि त्याच्याआधी "त" च्या बाराखडीतील "वर्तमानकालवाचक धातुसाधित" वापरलेले असते, तेव्हा हे मराठी वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Past Continuous Tense चा उपयोग करावा लागतो.

For example (उदाहरणार्थ),
  • आम्ही विहिरीतून पाणी काढत होतो.
  • We were drawing water from the well.

वरील मराठी वाक्यामध्ये होतो  हे क्रियापद वापरलेले असून त्याच्याआधी "त" च्या बाराखडीतील काढत हे "वर्तमानकालवाचक धातुसाधित" वापरलेले आहे.

त्यामुळे हे वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Past Continuous Tense चा उपयोग करावा लागतो.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • मी शाळेकडे वेगाने धावत होतो.
  • I was running fast towards the school.
Example 2
  • ते रानात भटकत होते.
  • They were wandering in the forest.
Example 3
  • ती मला हसत होती.
  • She was laughing at me.
Example 4
  • रमेश वाचनालयात वर्तमानपत्र वाचत होता.
  • Ramesh was reading a newspaper in the library.
Example 5
  • लीना कागदावर चित्र काढत होती.
  • Leena was drawing a picture on a sheet of paper.
Example 6
  • एक फळवाला रस्त्याच्या कडेला द्राक्षे विकत होता.
  • A fruit vendor was selling grapes along the roadside.
Example 7
  • आमची मांजर उन्हात शेकत होती.
  • Our cat was basking in the sun.
Example 8
  • हरणे वाघापासून दूर पळत होती.
  • The deer were running away from the tiger.

This article has been first posted on and last updated on by