Past Perfect Tense

Past Perfect Tense (पास्ट परफेक्ट टेन्स) म्हणजे पूर्ण भूतकाळ होय.

जेव्हा एखादी क्रिया शंभर टक्के खूप आधी पूर्ण झालेली असते, तेव्हा अशी क्रिया व्यक्त करण्यासाठी Past Perfect Tense चा उपयोग करतात.

नियम १

इंग्रजी वाक्यात Subject नंतर वाक्याच्या दुसऱ्या स्थानी जेव्हा had हे Auxiliary Verb वापरलेले असते आणि त्याच्यासोबत एखादे Past Participle वापरलेले असते, तेव्हा त्या वाक्याला Past Perfect Tense चे वाक्य असे म्हणतात.

नियम २

जेव्हा मराठी वाक्याच्या अगदी शेवटी होता / होती / होते  यांपैकी एखादे क्रियापद वापरलेले असते आणि त्याच्याआधी "ल" च्या बाराखडीतील "भूतकालवाचक धातुसाधित" वापरलेले असते, तेव्हा हे मराठी वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Past Perfect Tense चा उपयोग करावा लागतो.

For example (उदाहरणार्थ),
 • राजेशने बागेत गुलाबाची रोपे लावली होती.
 • Rajesh had planted rose bushes in the garden.

वरील मराठी वाक्यामध्ये होती  हे क्रियापद वापरलेले असून त्याच्याआधी "ल" च्या बाराखडीतील लावली हे "भूतकालवाचक धातुसाधित" वापरलेले आहे.

त्यामुळे हे वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Past Perfect Tense चा उपयोग करावा लागतो.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
 • दोन दिवसांपूर्वी मी एक फुलदाणी फोडली होती.
 • I had broken a flowerpot two days ago.
Example 2
 • आम्ही आमची उजळणी गेल्या सोमवारपासून सुरू केली होती.
 • We had begun our revision since last Monday.
Example 3
 • ते काल संध्याकाळी शिक्षकप्रमुखांना भेटले होते.
 • They had met the headmaster yesterday evening.
Example 4
 • विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी प्राणी संग्रहालयातील अनेक प्राणी पाहिले होते.
 • Students had seen many animals in the zoo last year.
Example 5
 • तिने तिची नवीन छत्री घेतली होती.
 • She had taken her new umbrella.
Example 6
 • ते शाळेचा गृहपाठ विसरले होते.
 • They had forgotten school homework.
Example 7
 • शोभाने तिचे जुने कपडे एका गरीब बाईला दिले होते.
 • Shobha had given her old clothes to a poor woman.
Example 8
 • मी दरवाजा उघडला होता.
 • I had opened the door.

This article has been first posted on and last updated on by