नियम १

Noun Clause आणि Adjective Clause च्या रचनांप्रमाणेच Adverb Clause (अॅड्व्हर्ब क्लॉज्) ची रचना सुद्धा Complex Sentence (मिश्र वाक्य) ची समजली जाते.

नियम २

Adverb Clause ची रचना असलेल्या Complex Sentence मधील दोन वेगवेगळी वाक्ये एकत्र जोडण्यासाठी ज्या शब्दाचा उपयोग करतात, त्याला Subordinating Conjunction असे म्हणतात.

नियम ३

Adverb Clause मधील ज्या वाक्याच्या आरंभी Subordinating Conjunction वापरलेले असते, त्या वाक्याला Subordinating Clause (गौणवाक्य) असे म्हणतात, तर उरलेल्या वाक्याला Main Clause (मुख्यवाक्य) असे म्हणतात.

Adverb Clause ची विभागणी प्रामुख्याने आठ प्रकारांमध्ये केलेली आहे.

हे आठ प्रकार पुढे दिल्याप्रमाणे आहेत.

Adverb Clause of Time

कालवाचक क्रियाविशेषणात्मक गौणवाक्य

यांमध्ये when, while, after, till, until इत्यादी Subordinating Conjunctions चा उपयोग केलेला असतो.

Read More

Adverb Clause of Place

स्थलवाचक क्रियाविशेषणात्मक गौणवाक्य

यांमध्ये where, wherever, whence इत्यादी Subordinating Conjunctions चा उपयोग केलेला असतो.

Read More

Adverb Clause of Purpose

हेतूदर्शक क्रियाविशेषणात्मक गौणवाक्य

यांमध्ये that, so that, lest इत्यादी Subordinating Conjunctions चा उपयोग केलेला असतो.

Read More

Adverb Clause of Reason or Cause

कारणदर्शक क्रियाविशेषणात्मक गौणवाक्य

यांमध्ये because, as, since इत्यादी Subordinating Conjunctions चा उपयोग केलेला असतो.

Read More

Adverb Clause of Condition

अटवाचक क्रियाविशेषणात्मक गौणवाक्य

यांमध्ये if, whether, unless इत्यादी Subordinating Conjunctions चा उपयोग केलेला असतो.

Read More

Adverb Clause of Result

यांमध्ये that या Subordinating Conjunction चा उपयोग केलेला असतो.

Read More

Adverb Clause of Supposition

यांमध्ये though, although, even though इत्यादी Subordinating Conjunctions चा उपयोग केलेला असतो.

Adverb Clause of Comparison

यांमध्ये as, than इत्यादी Subordinating Conjunctions चा उपयोग केलेला असतो.

This article has been first posted on and last updated on by