Analysis of Complex Sentence – विषय सूची

Analysis of Complex Sentence आणि Noun Clause हे विषय आधी समजून घ्यावेत, जेणेकरून Noun Clause in apposition to Noun or Pronoun समजून घेणे अधिक सोपे होईल.

नामाशी संबंधित It ने सुरू होणाऱ्या वाक्यातील Noun Clause ओळखण्यासाठी येथे पहा.

Noun Clause in apposition to Noun or Pronoun

इंग्रजी व्याकरणातील Complex Sentence (कॉम्प्लेक्स सेन्टेन्स) मध्ये जे गौणवाक्य noun म्हणून वापरलेले असते, त्याला Noun Clause (नाऊन क्लॉज्) म्हणजेच नामवाचक गौणवाक्य असे म्हणतात.

अशा Noun Clause चा संबंध वाक्यामध्ये जेव्हा एखाद्या abstract noun शी असतो किंवा this / that यांपैकी एखाद्या pronoun शी असतो, तेव्हा त्या Noun Clause ला Noun Clause in apposition to Noun or Pronoun (नाऊन क्लॉज् इन अपोजिशन् टू नाऊन ऑर प्रोनाऊन) म्हणजेच नामवाचक गौणवाक्य (नाम/सर्वनाम यांच्याशी संबंधित) असे म्हणतात.

‘Main Clause’ आणि ‘Subordinating Clause’

Complex Sentence मधील दोन वेगवेगळी वाक्ये एकत्र जोडण्यासाठी एखाद्या Subordinating Conjunction चा उपयोग केलेला असतो.

अशा वाक्यातील Subordinating Conjunction ने सुरू होणाऱ्या वाक्याला गौणवाक्य असे म्हणतात, तर दुसऱ्या वाक्याला मुख्यवाक्य असे म्हणतात.

गौणवाक्याला इंग्रजी व्याकरणामध्ये Subordinating Clause (सबॉर्डिनेटिंग् क्लॉज्) असे म्हणतात.

तसेच, मुख्यवाक्याला इंग्रजी व्याकरणामध्ये Main Clause (मेन क्लॉज्) किंवा Principal Clause (प्रिन्सिपल क्लॉज्) असे म्हणतात.

Noun Clause in apposition to Noun or Pronoun ची रचना

Noun Clause in apposition to Noun or Pronoun ची रचना नेहमी एखाद्या Complex Sentence मध्ये वापरलेली असते.

या रचनेत Subordinating Conjunction पासूनच्या Subordinating Clause चा संबंध Main Clause मधील एखाद्या Abstract Noun शी असतो किंवा this / that यांपैकी एखाद्या Pronoun शी असतो.

इंग्रजी व्याकरणामध्ये in apposition to (इन अपोजिशन् टू) चा उपयोग वाक्यामध्ये एकमेकांच्या जवळ असणाऱ्या दोन शब्दांतील परस्पर संबंध दर्शविण्यासाठी केला जातो.

या रचनेमध्ये Main Clause आणि Subordinating Clause यांना जोडण्यासाठी नेहमी that (दॅट) हे Subordinating Conjunction वापरलेले असते.

या रचनेत वाक्याची सुरूवात ज्या noun ने केलेली असते, त्याला जर that ने सुरू होणारा Subordinating Clause जोडलेला असेल, तर हे Noun त्या Main Clause चा subject म्हणून वापरलेले असते.

परंतु, संपूर्ण वाक्यात जर that हे Subordinating Conjunction वाक्याच्या मध्ये इतरत्र कुठेतरी वापरलेले असेल, तर हे noun वाक्यातील Main Clause च्या शेवटी आहे, असे समजावे.

For example (उदाहरणार्थ),
 • You must not forget this that honesty is the best policy.
 • तुम्ही हे कधीही विसरता कामा नये की प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण आहे.

वरील वाक्यामध्ये this या pronoun ला जोडून that या Subordinating Conjunction ने सुरू होणारा ‘that honesty is the best policy’ हा Subordinating Clause वापरलेला आहे.

त्यामुळे, या Subordinating Clause ला Noun Clause in apposition to pronoun असे म्हणतात.

या वाक्याचे पृथक्करण पुढीलप्रमाणे करता येते –

 • Main Clause  You must not forget this
 • Subordinating Clause  that honesty is the best policy
 • Noun Clause in apposition to pronoun ‘this’ in the Main Clause
For example (उदाहरणार्थ),
Example 1
 • Your statement that you found the money in the street won't be believed.
 • Main Clause  Your statement won't be believed
 • Subordinating Clause  that you found the money in the street
 • Noun Clause in apposition to Noun ‘statement’ in the Main Clause
Example 2
 • His belief that he would succeed cheered him through many disappointments.
 • Main Clause  His belief cheered him through many disappointments
 • Subordinating Clause  that he would succeed
 • Noun Clause in apposition to Noun ‘belief’ in the Main Clause
Example 3
 • You gave me hope that you would help me in my difficulty.
 • Main Clause  You gave me hope
 • Subordinating Clause  that you would help me in my difficulty
 • Noun Clause in apposition to Noun ‘hope’ in the Main Clause
Example 4
 • They did not accept the accusation that he had stolen the money.
 • Main Clause  They did not accept the accusation
 • Subordinating Clause  that he had stolen the money
 • Noun Clause in apposition to Noun ‘accusation’ in the Main Clause

This article has been first posted on and last updated on by