नियम १

एखादी गोष्ट जेव्हा एखाद्या हेतूने केली जाते, तेव्हा ती गोष्ट करण्यामागचा हेतू व्यक्त करण्यासाठी with a view to या phrase उपयोग केला जातो.

नियम २

या phrase चा वापर करताना वाक्यामध्ये to ला जोडून नेहमी Gerund वापरलेले असते.

या रचनेमध्ये to सोबत कधीही Infinitive वापरू नये.

नियम ३

Gerund हे प्रत्यक्षात To चे Verb असल्यामुळे ते Transitive (सकर्मक) किंवा Intransitive (अकर्मक) असू शकते.

Transitive (सकर्मक) असल्यास त्याला स्वतःचे Object आणि Extension असू शकते.

Examples (उदाहरणार्थ)
Ex. 1
  • गरीब विद्यार्थांना मदत करण्याच्या हेतूने तिने एक निधी उभारण्याचे ठरविले आहे.
  • She has decided to raise a fund with a view to helping poor students.
Ex. 2
  • काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्याच्या हेतूने पंतप्रधानांनी तातडीची बैठक बोलावली होती.
  • The Prime Minister had called an emergency meeting with a view to discussing some important issues.
Ex. 3
  • त्याने घर बांधण्याच्या हेतूने थोडी जमीन विकत घेतली होती.
  • He had bought some land with a view to building a house.

This article has been first posted on and last updated on by