Analysis of Complex Sentence – विषय सूची

Analysis of Complex Sentence हा विषय आधी समजून घ्यावा, जेणेकरून Noun Clause समजून घेणे अधिक सोपे होईल.

इंग्रजी व्याकरणातील ‘Adverb Clause’

इंग्रजी व्याकरणातील Complex Sentence (कॉम्प्लेक्स सेन्टेन्स) मध्ये जे गौणवाक्य Adverb म्हणून वापरलेले असते, त्याला Adverb Clause (ऍड्व्हर्ब क्लॉज्) म्हणजेच क्रियाविशेषणवाचक गौणवाक्य असे म्हणतात.

‘Main Clause’ आणि ‘Subordinating Clause’

Complex Sentence मधील दोन वेगवेगळी वाक्ये एकत्र जोडण्यासाठी एखाद्या Subordinating Conjunction चा उपयोग केलेला असतो.

अशा वाक्यातील Subordinating Conjunction ने सुरू होणाऱ्या वाक्याला गौणवाक्य असे म्हणतात, तर दुसऱ्या वाक्याला मुख्यवाक्य असे म्हणतात.

गौणवाक्याला इंग्रजी व्याकरणामध्ये Subordinating Clause (सबॉर्डिनेटिंग् क्लॉज्) असे म्हणतात.

तसेच, मुख्यवाक्याला इंग्रजी व्याकरणामध्ये Main Clause (मेन क्लॉज्) किंवा Principal Clause (प्रिन्सिपल क्लॉज्) असे म्हणतात.

Adverb Clause ची रचना

Adverb Clause ची रचना नेहमी एखाद्या Complex Sentence मध्ये वापरलेली असते.

For example (उदाहरणार्थ),
  • Bring me some water before you go.
  • तुम्ही जाण्याच्या आधी माझ्यासाठी थोडं पाणी आणा.

वरील वाक्यामध्ये ‘Bring me some water’ आणि ‘you go’ या दोन वाक्यांना जोडण्यासाठी before (बिफोर) हे Subordinating Conjunction वापरलेले आहे. त्यामुळे, या संपूर्ण जोडवाक्याला Complex Sentence म्हणजेच मिश्र वाक्य समजावे.

तसेच, ‘before you go‘ हा संपूर्ण शब्दसमूह Adverb म्हणून वापरलेला असल्यामुळे या शब्दसमूहाला Adverb Clause असे म्हणतात.

या वाक्याचे पृथक्करण केल्यास वाक्याची विभागणी पुढीलप्रमाणे करता येते –

Main Clause: Bring me some water
Subordinating Clause: before you go
Subordinating Conjunction: before

इंग्रजी व्याकरणातील Adverb Clause ची विभागणी पुढीलप्रमाणे आठ भागात केलेली आहे.

Adverb Clause of Time

यांमध्ये when, while, after, till, until, whenever इत्यादी कालदर्शक Subordinating Conjunctions चा उपयोग केलेला असतो.

Adverb Clause of Time
Adverb Clause of Place

यांमध्ये where, wherever, whence इत्यादी स्थलदर्शक Subordinating Conjunctions चा उपयोग केलेला असतो.

Adverb Clause of Place
Adverb Clause of Purpose

यांमध्ये that, so that, lest इत्यादी हेतूदर्शक Subordinating Conjunctions चा उपयोग केलेला असतो.

Adverb Clause of Purpose
Adverb Clause of Reason or Cause

यांमध्ये because, as, since इत्यादी कारणदर्शक Subordinating Conjunctions चा उपयोग केलेला असतो.

Adverb Clause of Reason or Cause
Adverb Clause of Condition

यांमध्ये if, whether, unless इत्यादी अटदर्शक Subordinating Conjunctions चा उपयोग केलेला असतो.

Adverb Clause of Condition
Adverb Clause of Result or Consequence

यांमध्ये that या परिणामदर्शक Subordinating Conjunctions चा उपयोग केलेला असतो.

Adverb Clause of Result or Consequence
Adverb Clause of Supposition or Concession

यांमध्ये though, although, even though इत्यादी ग्राह्यतादर्शक Subordinating Conjunctions चा उपयोग केलेला असतो.

Adverb Clause of Supposition or Concession
Adverb Clause of Comparison

यांमध्ये as, than इत्यादी तुलनात्मक Subordinating Conjunctions चा उपयोग केलेला असतो.

This article has been first posted on and last updated on by