Simple Preposition “by”

by (बाय) हे एक Simple Preposition आहे.

इंग्रजी व्याकरणामध्ये by  चा उपयोग Preposition किंवा Adverb अशा दोन्हीही प्रकारे करता येतो.

जेव्हा by ला जोडून त्यानंतर एखादे Noun किंवा Pronoun वापरलेले असते, तेव्हा त्याला Preposition असे म्हणतात.

मात्र, जेव्हा by हे एखाद्या To च्या Verb ला जोडून वापरलेले असते आणि त्याला कोणतेही Noun किंवा Pronoun जोडलेले नसते, तेव्हा त्याचा उपयोग वाक्यामध्ये Adverb म्हणून केलेला असतो.

Simple Preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये by चा उपयोग पुढीलपैकी एका अर्थाने केला जातो.

by = जवळ, शेजारी, पाशी

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • He was sitting by the beach.
  • तो समुद्रकिनाऱ्याजवळ बसला होता.
Example 2
  • They were standing by the door.
  • ते दाराजवळ (दाराशेजारी) उभे होते.

by = शेजारून, वरून (गतिवाचक)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • I go by the post office every day.
  • मी दररोज पोस्ट ऑफिसवरून जातो.
Example 2
  • He ran by us in the morning.
  • तो सकाळी आमच्या शेजारून धावत गेला.

by = वेळी, दरम्यान, मध्ये, पर्यंत, पूर्वी (कालावधी)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • He will reach there by night.
  • तो रात्री (रात्रीच्या वेळी) तेथे पोहोचेल.
Example 2
  • Farmers return home by evening.
  • शेतकरी संध्याकाळपर्यंत घरी परत येतात.

by = ...ने (वाहनाने)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • He came by car.
  • तो गाडीने आला.
Example 2
  • She was travelling by plane.
  • ती विमानाने प्रवास करत होती.

वाहनाने या अर्थी जेव्हा by चा उपयोग वाक्यामध्ये केलेला असतो, तेव्हा by आणि त्यानंतर वापरलेले Noun यांच्यामध्ये कधीही a, an किंवा the  यांपैकी कोणतेही Article (आर्टिकल) म्हणजेच उपपद वापरू नये.

त्याचप्रमाणे, by आणि त्यानंतर वापरलेले Noun यांच्यामध्ये कोणतेही Possessive Adjective सुद्धा वापरू नये.

This article has been first posted on and last updated on by