Primary Auxiliary Verbs


प्रमुख सहाय्यक क्रियापदेPrimary Auxiliary Verbs in English Grammar

Primary Auxiliary Verb (प्रायमरी ऑक्झिलियरी व्हर्ब)) म्हणजे प्रमुख सहाय्यक क्रियापद होय.

Primary Auxiliary Verb चा उपयोग सामान्यतः वाक्याचा Tense दर्शविण्यासाठी केला जातो. वाक्याच्या Tense प्रमाणे वाक्याचा अर्थ व्यक्त करण्यासाठी ते क्रियापदाला सहाय्य करते.

Primary Auxiliary Verb ला पहिल्या गटाचे Auxiliary Verb असेही म्हटले जाते.

इंग्रजी व्याकरणातील Primary Auxiliary Verbs पुढे दिल्याप्रमाणे आहेत.

be

be (बी) हे एक Primary Auxiliary Verb आहे.

इंग्रजी वाक्यामध्ये be चा उपयोग am, is, are, was, were, been, being यांपैकी एका स्वरूपात केला जातो.

be चा संबंध Continuous Series, Perfect Series आणि Perfect Continuous Series च्या tenses शी असतो.

Read more about “be”
shall, will

shall (शाल) आणि will (विल) ही दोन्हीही Primary Auxiliary Verbs आहेत.

shall आणि will चा संबंध Simple Series, Continuous Series, Perfect Series आणि Perfect Continuous Series च्या tenses शी असतो.

Read more about “shall” and “will”
have

have (हॅव) हे एक Primary Auxiliary Verb आहे.

have चा संबंध Perfect Series आणि Perfect Continuous Series च्या tenses शी असतो.

Read more about “have”
do

do (डू) हे एक Primary Auxiliary Verb आहे.

इंग्रजी वाक्यामध्ये do चा उपयोग do, does, did यांपैकी एका स्वरूपात केला जातो.

सामान्यतः ते नकारार्थी वाक्यात नकार दर्शविण्यासाठी not सोबत वापरले जाते.

do चा संबंध Simple Series च्या tense शी असतो.

Read more about “do”

This article has been first posted on and last updated on by