Object


सकर्मक क्रियापदाचे कर्मनियम १

इंग्रजी वाक्यातील तिसऱ्या स्थानी वाक्यातील क्रियापदाचे Object (ऑब्जेक्ट) म्हणजेच कर्म वापरले जाते.

नियम २

वाक्यातील दुसऱ्या स्थानातील Verb ने सूचित होणाऱ्या क्रियेला काय किंवा कोणाला यांपैकी एखादा प्रश्न विचारला की क्रियापदाचे Object कळते.

वाक्यातील Verb ला जर काय किंवा कोणाला यांपैकी एखादा प्रश्न विचारता येत असेल, तर ते Verb नेहमी Transitive म्हणजे सकर्मक आहे असे समजावे.

जेव्हा वाक्यामध्ये Transitive Verb वापरलेले असते, तेव्हाच वाक्याच्या तिसऱ्या स्थानी या सकर्मक क्रियापदाला जोडून Object येऊ शकते.

नियम ३

वाक्यातील Object ला कधीही Verb ने सूचित होणारी क्रिया करता येत नाही.

Verb ने सूचित होणारी क्रिया करण्यात ते निष्क्रिय म्हणजेच Passive असते.

वाक्याचा Subject जी क्रिया करत असतो ती क्रिया या Passive (निष्क्रिय) असलेल्या Object वर घडत असते.

नियम ४
Direct Object (प्रत्यक्ष कर्म)

वाक्यातील क्रियापदाने सूचित होणाऱ्या क्रियेला काय हा प्रश्न विचारला कि क्रियापदाचे Direct Object (डायरेक्ट ऑब्जेक्ट) कळते.

उदाहरणार्थ –
  • He killed the rat.
  • त्याने उंदीर मारला.

या वाक्यामध्ये kill (किल् = मारणे) या क्रियापदाला काय हा प्रश्न विचारला असता rat (रॅट् = उंदीर) हे उत्तर मिळते.

त्यामुळे, या वाक्यामध्ये rat हे नाम kill या क्रियापदाचे Direct Object म्हणजे प्रत्यक्ष कर्म आहे.

नियम ५
Indirect Object (अप्रत्यक्ष कर्म)

वाक्यातील क्रियापदाने सूचित होणाऱ्या क्रियेला कोणाला हा प्रश्न विचारला कि क्रियापदाचे Indirect Object (इन्डायरेक्ट ऑब्जेक्ट) कळते.

उदाहरणार्थ –
  • He gave the man some food.
  • त्याने त्या माणसाला थोडेसे अन्न दिले.

या वाक्यामध्ये kill give (गिव्ह = देणे) या क्रियापदाला कोणाला हा प्रश्न विचारला असता man (मॅन = माणूस) हे उत्तर मिळते.

त्यामुळे, या वाक्यामध्ये man हे नाम give या क्रियापदाचे Indirect Object म्हणजे अप्रत्यक्ष कर्म आहे.

नियम ६

वाक्यातील Object हे सामान्यतः पुढीलपैकी एखाद्या स्वरूपाचे असते –

This article has been first posted on and last updated on by