Simple Preposition “over”

over (ओव्हर्) हे एक Simple Preposition आहे.

इंग्रजी व्याकरणामध्ये over चा उपयोग Noun, Adverb किंवा Preposition यांपैकी एका प्रकारे करता येतो.

Simple Preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये over चा उपयोग पुढील अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

over = वर ("अधांतरी" वर, स्पर्श न करता)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • The sky is over our heads.
  • आकाश आपल्या वर (डोक्यावर अधांतरी) आहे.
Example 2
  • Some branches of the banian tree have grown over the river.
  • वडाच्या झाडाच्या काही फांद्या नदीवर (नदीच्या पाण्याला स्पर्श न करता अधांतरी) वाढल्या आहेत.

"अधांतरी" वर या अर्थी जेव्हा over चा उपयोग वाक्यामध्ये केलेला असतो, तेव्हा over ऐवजी above हे Compound Preposition देखील वापरता येते.

over = वर (पृष्ठभागावर त्याला स्पर्श करून)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • She put the cloth over the table.
  • तिने ते कापड टेबलावर (टेबलाच्या पृष्ठभागावर) टाकले.
Example 2
  • He put his hands over his eyes.
  • त्याने त्याचे हात त्याच्या डोळ्यांवर ठेवले.

over = वरून पलीकडे

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • He threw the ball over the wall.
  • त्याने चेंडू भिंतीवरून पलीकडे फेकला.
Example 2
  • They climbed over the fence and escaped.
  • कुंपणावरून पलीकडे चढून ते पळाले.

over = ..करताना (काही क्रिया चालू असताना)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • We can discuss it over a cup of tea.
  • याविषयी आपण चहा घेत असताना बोलू शकतो.
Example 2
  • They were watching a movie over dinner.
  • जेवताना ते एक सिनेमा बघत होते.

over = ..मुळे (काही कारणामुळे)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • They were fighting over money.
  • ते पैशावरून (पैशाच्या कारणामुळे) भांडत होते.
Example 2
  • It is no use crying over spilt milk.
  • झालेल्या चुकीवर (झालेल्या चुकीच्या कारणामुळे) रडण्यात काही अर्थ नाही.

This article has been first posted on and last updated on by