have to आणि has to ची रचना

जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला करावयाची असते किंवा रोजचा नियम किंवा सवय म्हणून ती करावी लागते, तेव्हा have to (हॅव् टू) आणि has to (हॅज् टू) ची रचना वापरली जाते.

नियम १

या रचनेमध्ये have किंवा has ला जोडून एखादे Infinitive वापरलेले असते. त्यामुळे या रचनेला have to किंवा has to ची रचना असे म्हणतात.

नियम २

have to आणि has to ची रचना नेहमी Present Tense (प्रेझेंट टेन्स) म्हणजेच वर्तमानकाळाची समजली जाते.

नियम ३

have to आणि has to च्या रचनेमध्ये have आणि has यांपैकी एका क्रियापदाचा वापर वाक्यातील Main Verb म्हणून केलेला असतो.

त्यामुळे या रचनेतील वाक्यामध्ये have किंवा has ला To have चे Verb किंवा Auxiliary Verb समजू नये.

नियम ४

वाक्याचा Subject हा कोणत्या Person मध्ये आणि Number मध्ये आहे, हे लक्षात घेऊन have किंवा has यांपैकी योग्य ते क्रियापद वापरावे लागते.

Person
(पुरुष)
Singular
(एकवचन)
Plural
(अनेकवचन)
First Person
(प्रथम पुरुष)
I have to We have to
Second Person
(द्वितीय पुरुष)
You have to
(तू)
You have to
(तुम्ही)
Third Person
(तृतीय पुरुष)
He has to They have to
She has to
It has to
Singular Noun
+
has to
Plural Noun
+
has to
For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • स्मिताला उद्या दोन नवीन रोपे लावायची आहेत.
  • Smita has to plant two new seedlings tomorrow.
Example 2
  • दिनेशला रोज सकाळी दुधाचा उकाडा घालावा लागतो.
  • Dinesh has to deliver milk every morning.
Example 3
  • मुलांना रोज शाळेत जावे लागते.
  • Children have to go to school everyday.
Example 4
  • नगरपालिकेला पुढील महिन्यात नगरातील सर्व रस्त्यांची सुधारणा करायची आहे.
  • The municipality has to improve all the roads in the town in the next month.
Example 5
  • विद्यार्थ्यांना शाळेमध्ये गणवेष घालावा लागतो.
  • Students have to wear uniforms in school.

This article has been first posted on and last updated on by