Active Passive Voice आणि Active Voice of Affirmative Imperative Sentence हा विषय आधी समजून घ्यावा, जेणेकरून Negative Imperative Sentence मधील Voice समजून घेणे अधिक सोपे होईल.

Negative Imperative Sentence मधील Voice – विषय सूची
Negative Imperative Sentence मधील “Voice”

इंग्रजी व्याकरणामधील Active Voice (ऍक्टिव्ह वॉईस्) म्हणजे कर्तरी प्रयोग होय, तर Passive Voice (पॅसिव्ह वॉईस्) म्हणजे कर्मणी प्रयोग होय.

जेव्हा इंग्रजी वाक्याची सुरूवात Do not किंवा Don't यांपैकी एखाद्या शब्दसमूहाने केलेली असते, त्या वाक्याला Active Voice चे Negative Sense (निगेटिव सेन्स) चे Imperative Sentence (इम्परेटीव सेन्टेन्स) असे म्हणतात.

Negative Imperative Sentence

मराठीमध्ये Negative Sense (निगेटिव सेन्स) याचा अर्थ नकारार्थी किंवा नकारात्मक असा आहे.

तसेच, Imperative Sentence (इम्परेटीव सेन्टेन्स) याचा अर्थ आज्ञार्थी वाक्य किंवा विनंतीवाचक वाक्य असा आहे.

त्यामुळे, Negative Imperative Sentence (निगेटिव इम्परेटीव सेन्टेन्स) याचा अर्थ नकारार्थी / नकारात्मक आज्ञार्थी / विनंतीवाचक वाक्य असा आहे.

Imperative Sentence चा Subject

कोणत्याही Imperative Sentence मध्ये वाक्याचा Subject हा गृहीत धरलेला असतो.

अशा वाक्यामध्ये वाक्याचा Subject स्पष्टपणे (explicitly) लिहिण्याची आवश्यकता नसते.

Negative Imperative Sentence मधील Vocative

कधीकधी Do not किंवा Don't ने सुरू झालेल्या Imperative Sentence च्या अगोदर एखादे Noun हे संबोधन म्हणून वापरलेले असते.

संबोधन म्हणून वापरलेल्या Noun ला इंग्रजी व्याकरणामध्ये Vocative (व्होकेटीव) असे म्हणतात.

संबोधनाचे Noun हे त्या संबंधित Imperative Sentence चा भाग नसते, त्यामुळे संबोधन म्हणून वापरलेल्या Noun ला जोडून नेहमी comma (कॅामा) म्हणजे स्वल्पविराम हे विरामचिन्ह वापरलेले असते.

Negative Imperative Sentence ओळखताना Vocative विचारात घेऊ नये.

For example (उदाहरणार्थ),
  • Boy, do not bring those books to me.
  • ए मुला, ती पुस्तके माझ्याकडे घेऊन येऊ नकोस.

वरील वाक्यामध्ये do not या शब्दसमूहाच्या आधी boy हे noun वापरलेले असून त्याला जोडून comma केलेला आहे.

या वाक्यामध्ये boy हे noun वाक्यातील Vocative आहे.

तसेच, वाक्याची सुरूवात do not ने केलेली असल्यामुळे या वाक्याला Negative Imperative Sentence समजावे.

Negative Imperative Sentence मधील Adverb

कधीकधी Negative Imperative Sentence च्या अगोदर Please, Now, Then अशा प्रकारचे एखादे Adverb वापरलेले असते.

हे Adverb सुद्धा या Imperative Sentence चा भाग नसल्यामुळे ते विचारात घेऊ नये.

For example (उदाहरणार्थ),
  • Please don't ask your questions.
  • कृपया आपले प्रश्न विचारू नका.

वरील वाक्यामध्ये don't या शब्दसमूहाच्या आधी Please हे adverb वापरलेले आहे.

Passive Voice ची रचना करण्याचे नियम

Negative Imperative Sentence मधील Active Voice च्या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी पुढील नियम वापरावेत.

नियम १ (पहिले स्थान)

Imperative Sentence च्या अगोदर जर एखादे Vocative किंवा Adverb वापरलेले असेल, तर पहिल्या स्थानी ते लिहावे.

नियम २ (दुसरे स्थान)

दुसऱ्या स्थानी let लिहावे. वाक्यामध्ये जेव्हा एखादे Vocative किंवा Adverb वापरलेले नसते, तेव्हा Let चे पहिले अक्षर Capital मध्ये लिहावे.

नियम ३ (तिसरे स्थान)

तिसऱ्या स्थानी वाक्यातील वाक्यातील To च्या Verb चे Object आहे त्याच स्वरूपात लिहावे.

नियम ४ (चौथेे स्थान)

चौथ्या स्थानी be लिहावे.

नियम ५ (पाचवे स्थान)

पाचव्या स्थानी not लिहावे.

नियम ६ (सहावे स्थान)

सहाव्या स्थानी वाक्यातील To च्या Verb चे Past Participle लिहावे.

नियम ७ (सातवे स्थान)

सातव्या स्थानी वाक्यातील उरलेले शब्द लिहावेत.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
Active VoiceDon't polish my shoes  in a hurry.
Passive Voice Let my shoes be not polished  in a hurry.
Example 2
Active VoiceDo not refuse your daughter  to be vaccinated.
Passive Voice Let your daughter be not refused  to be vaccinated.
Example 3
Active VoiceDo not follow me  as it is my resting time.
Passive Voice Let me be not followed  as it is my resting time.
Example 4
Active VoiceDon't forget your past experiences.
Passive Voice Let your past experiences be not forgotten.
Example 5
Active VoiceDon't find faults  in my proposed plans.
Passive Voice Let faults be not found  in my proposed plans.

This article has been first posted on and last updated on by