Active and Passive Voice


कर्तरी आणि कर्मणी प्रयोग



Active Passive Voice – विषय सूची
इंग्रजी व्याकरणातील “Voice” म्हणजे काय?

इंग्रजी व्याकरणामधील Voice (वॉईस्) म्हणजे वाक्याचा प्रयोग होय.

यांमध्ये Active Voice (ऍक्टिव्ह वॉईस्) म्हणजे कर्तरी प्रयोग आणि Passive Voice (पॅसिव्ह वॉईस्) म्हणजे कर्मणी प्रयोग यांचा समावेश होतो.

Voice च्या रचनेतील Verb

इंग्रजी व्याकरणामधील Voice ची रचना ही एखाद्या क्रियेशी संबंधित असल्यामुळे अशा वाक्यामध्ये नेहमी क्रियादर्शक To चे Verb वापरलेले असते.

तसेच, या रचनेचा संबंध वाक्याचा Subject आणि वाक्यातील Object असा दोहोंशी येत असल्यामुळे Voice च्या रचनेमधील वाक्याचे Verb हे नेहमी Transitive (ट्रान्झिटिव्ह) म्हणजे सकर्मक असते.

Active Voice ची रचना

Active Voice (ऍक्टिव्ह वॉईस्) म्हणजे कर्तरी प्रयोग होय.

इंग्रजी वाक्याच्या पहिल्या स्थानी वापरलेला Subject हा वाक्यातील दुसऱ्या स्थानी वापरलेल्या Verb ने सूचित होणारी क्रिया करत असतो.

जेव्हा वाक्याचा Subject ही क्रिया करण्यामध्ये Active (ऍक्टिव्ह) म्हणजे सक्रीय असतो, तेव्हा त्या वाक्याला Active Voice चे म्हणजेच कर्तरी प्रयोगाचे वाक्य असे म्हणतात.

For example (उदाहरणार्थ),
  • Aakash bought a bike.
  • आकाशने एक दुचाकी विकत घेतली.

वरील वाक्यामध्ये buy (विकत घेणे) हे transitive To चे Verb वापरलेले असून वाक्याचा Subject म्हणून Aakash हे Proper Noun वापरलेले आहे.

तसेच, वाक्याचा हा Subject वाक्यातील क्रिया करण्यामध्ये Active म्हणजे सक्रीय असल्यामुळे हे वाक्य Active Voice चे म्हणजे कर्तरी प्रयोगाचे समजावे.

Passive Voice ची रचना

Passive Voice (पॅसिव्ह वॉईस्) म्हणजे कर्मणी प्रयोग होय.

इंग्रजी वाक्याच्या तिसऱ्या स्थानी वापरलेल्या Object ला कधीही दुसऱ्या स्थानी वापरलेल्या Verb ने सूचित होणारी क्रिया करता येत नाही.

अशी क्रिया करण्यामध्ये वाक्याचे Object हे नेहमी Passive (पॅसिव्ह) म्हणजे निष्क्रिय असते.

मात्र, जेव्हा वाक्यातील Passive असलेले Object वाक्याच्या पहिल्या स्थानी वापरलेले असते आणि वाक्याचा Subject हा वाक्याच्या तिसऱ्या स्थानी वापरलेला असतो, तेव्हा त्या वाक्याला Passive Voice चे म्हणजेच कर्मणी प्रयोगाचे वाक्य असे म्हणतात.

For example (उदाहरणार्थ),
  • A bike was bought by Aakash.
  • आकाशकडून एक दुचाकी विकत घेण्यात आली.

वरील वाक्यामध्ये bike हे Common Noun खरंतर buy (विकत घेणे) या To च्या Verb चे Object आहे.

परंतु, ते वाक्याच्या तिसऱ्या स्थानी न वापरता वाक्याच्या पहिल्या स्थानी वापरलेले आहे.

तसेच, वाक्याचा सक्रीय असणारा Aakash हा Subject वाक्याच्या पहिल्या स्थानी न वापरता by या Preposition ला जोडून वाक्याच्या तिसऱ्या स्थानी वापरण्यात आला आहे.

त्यामुळे हे वाक्य Passive Voice चे म्हणजे कर्मणी प्रयोगाचे समजावे.

Active Passive Voice हा विषय समजून घेण्यासाठी त्याची विभागणी वाक्यांच्या प्रकारानुसार पुढीलप्रमाणे केलेली आहे.

First Kind based on “Tenses”
Simple Present Tense (साधा वर्तमानकाळ)
Simple Past Tense (साधा भूतकाळ)
Simple Future Tense (साधा भविष्यकाळ)
Present Continuous Tense (चालू वर्तमानकाळ)
Past Continuous Tense (चालू भूतकाळ)
Fourth Kind having an “Auxiliary Verb”

This article has been first posted on and last updated on by