Present Continuous Tense मधील Active Voice – विषय सूची

Active Passive Voice हा विषय आधी समजून घ्यावा, जेणेकरून Present Continuous Tense मधील Active Voice समजून घेणे अधिक सोपे होईल.

Present Continuous Tense चा “Active Voice”

इंग्रजी व्याकरणामधील Active Voice (ऍक्टिव्ह वॉईस्) म्हणजे कर्तरी प्रयोग होय.

Active Voice च्या वाक्यामध्ये जेव्हा am, is किंवा are यांपैकी एखादे Auxiliary Verb वापरलेले असते आणि त्याला जोडून एखादे Present Participle वापरलेले असते, तेव्हा त्या वाक्याला Present Continuous Tense चे वाक्य असे म्हणतात.

Active Voice ची रचना

जेव्हा Present Continuous Tense मधील Active Voice च्या वाक्याचे रूपांतर Passive Voice मध्ये करावयाचे असते, तेव्हा त्या वाक्याचे पुढील घटक लक्षात घ्यावे लागतात.

Subject  +  am / is / are  +  Present Participle  +  Object

इंग्रजी वाक्याच्या पहिल्या स्थानी वापरलेला Subject हा वाक्यातील दुसऱ्या स्थानी वापरलेल्या Verb ने सूचित होणारी क्रिया करण्यामध्ये Active (ऍक्टिव्ह) म्हणजे सक्रीय असतो.

तसेच, ही क्रिया वाक्यातील तिसऱ्या स्थानी वापरलेल्या Object वर घडत असते.

Active Voice च्या वाक्यातील Object

Active Voice च्या वाक्याचे रूपांतर Passive Voice मध्ये करण्यासाठी वाक्यामध्ये Object ची आवश्यकता असते.

Object म्हणून सामान्यतः एखादे Noun किंवा Accusative Case चे Pronoun वापरलेले असते आणि ते To च्या Verb ला जोडून वापरलेले असते.

For example (उदाहरणार्थ),
  • He is reading a book.
  • तो पुस्तक वाचत आहे.

वरील वाक्यामध्ये is हे Auxiliary Verb वापरलेले असून त्याला जोडून reading हे Present Participle वापरलेले आहे.

वाक्याच्या तिसऱ्या स्थानी Object म्हणून book हे Common Noun वापरलेले आहे.

तसेच, वाक्याचा Subject म्हणून He हे Pronoun वापरलेले आहे.

वाक्याचा हा Subject वाक्यातील क्रिया करण्यामध्ये Active म्हणजे सक्रीय असल्यामुळे हे वाक्य Active Voice चे म्हणजे कर्तरी प्रयोगाचे समजावे.

Passive Voice ची रचना करण्याचे नियम

Present Continuous Tense च्या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी पुढील नियम वापरावेत.

नियम १ (पहिले स्थान)

पहिल्या स्थानी वाक्यातील Object लिहावे.

Object म्हणून जर एखादे Noun वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.

परंतु, Object म्हणून जर Accusative Case चे Pronoun वापरलेले असेल, तर त्याचे रूपांतर Nominative Case च्या Pronoun मध्ये पुढीलप्रमाणे करावे.

Accusative Case चे Pronoun Nominative Case चे Pronoun
me I
us We
you You
him He
her She
it It
them They
नियम २ (दुसरे स्थान)

दुसऱ्या स्थानी am being, is being किंवा are being यांपैकी योग्य ते To be चे Verb लिहावे.

Active Voice च्या वाक्यातील Object लक्षात घेऊन योग्य ते To be चे Verb पुढीलप्रमाणे वापरावे.

Object To be चे Verb
me am being
him is being
her
it
Singular Number Noun
us are being
you
them
Plural Number Noun
नियम ३ (तिसरे स्थान)

तिसऱ्या स्थानी वाक्यातील To च्या Verb चा ing प्रत्यय काढून त्याचे Past Participle म्हणजे तिसरे रूप लिहावे.

नियम ४ (चौथेे स्थान)

चौथ्या स्थानी वाक्यातील उरलेले शब्द लिहावेत.

नियम ५ (पाचवे स्थान)

पाचव्या स्थानी by हे Preposition लिहावे.

नियम ६ (सहावेे स्थान)

सहाव्या स्थानी वाक्यातील Subject लिहावा.

Subject म्हणून जर एखादे Noun वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.

परंतु, Subject म्हणून जर Nominative Case चे Pronoun वापरलेले असेल, तर त्याचे रूपांतर Accusative Case च्या Pronoun मध्ये पुढीलप्रमाणे करावे.

Nominative Case चे Pronoun Accusative Case चे Pronoun
I me
We us
You you
He him
She her
It it
They them
For example (उदाहरणार्थ),
Example 1
Active Voice  She is helping me in my studies.
Passive Voice  I am being helped in my studies by her.

वरील Active Voice च्या वाक्यामध्ये पहिल्या स्थानी Subject म्हणून She हे Nominative Case चे Pronoun वापरलेले असून दुसऱ्या स्थानी is या Auxiliary Verb ला जोडून helping हे Present Participle वापरलेले आहे.

तसेच, तिसऱ्या स्थानी Object म्हणून me हे Accusative Case चे Pronoun वापरलेले आहे.

या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.

Example 2
Active Voice  Mother is stitching the torn handkerchief.
Passive Voice  The torn handkerchief is being stitched by mother.

वरील Active Voice च्या वाक्यामध्ये पहिल्या स्थानी Subject म्हणून Mother हे Common Noun वापरलेले असून दुसऱ्या स्थानी is या Auxiliary Verb ला जोडून stitching हे Present Participle वापरलेले आहे.

तसेच, तिसऱ्या स्थानी handkerchief  हे Common Noun वापरलेले आहे आणि त्याला जोडून torn हे Adjective वापरलेले आहे. त्यामुळे the torn handkerchief  या संपूर्ण शब्दसमूहाला Object समजावे.

या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.

Example 3
Active Voice  The boys are playing football after school.
Passive Voice  Football is being played after school by the boys.

वरील Active Voice च्या वाक्यामध्ये पहिल्या स्थानी Subject म्हणून Boys हे Common Noun वापरलेले असून दुसऱ्या स्थानी are या Auxiliary Verb ला जोडून playing हे Present Participle वापरलेले आहे.

तसेच, तिसऱ्या स्थानी Object म्हणून football हे Common Noun वापरलेले आहे.

या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.

Example 4
Active Voice  Radhika is telling a fairy-tale to the children.
Passive Voice  A fairy-tale is being told to the children by Radhika.

वरील Active Voice च्या वाक्यामध्ये पहिल्या स्थानी Subject म्हणून Radhika हे Proper Noun वापरलेले असून दुसऱ्या स्थानी is या Auxiliary Verb ला जोडून telling हे Present Participle वापरलेले आहे.

तसेच, तिसऱ्या स्थानी Object म्हणून a fairy-tale हे Common Noun वापरलेले आहे.

या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.

Example 5
Active Voice  He is reading a newspaper.
Passive Voice  A newspaper is being read by him.

वरील Active Voice च्या वाक्यामध्ये पहिल्या स्थानी Subject म्हणून He हे Nominative Case चे Pronoun वापरलेले असून दुसऱ्या स्थानी is या Auxiliary Verb ला जोडून reading हे Present Participle वापरलेले आहे.

तसेच, तिसऱ्या स्थानी Object म्हणून a newspaper हे Common Noun वापरलेले आहे.

या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.

This article has been first posted on and last updated on by