Active Voice - have/has/had + infinitive


कर्तरी प्रयोग - have/has/had + क्रियापदाचे मूळरूपhave/has/had + infinitive या रचनेच्या वाक्यामधील Voice समजणे अधिक सोपे होण्यासाठी पुढील विषय आधी समजून घ्यावा –

have/has/had + infinitive या रचनेच्या वाक्यामधील Voice – विषय सूची
have/has/had + infinitive या रचनेच्या वाक्यामधील “Voice”

इंग्रजी व्याकरणामधील Active Voice (ऍक्टिव्ह वॉईस्) म्हणजे कर्तरी प्रयोग होय, तर Passive Voice (पॅसिव्ह वॉईस्) म्हणजे कर्मणी प्रयोग होय.

जेव्हा इंग्रजी वाक्यामध्ये have/has/had + infinitive अशी रचना वापरलेली असते, तेव्हा Active Voice च्या वाक्यामध्ये Subject ला जोडून have (हॅव्), has (हॅज्) किंवा had (हॅड्) यांपैकी एखादे Main Verb वापरलेले असते.

तसेच, या Main Verb ला जोडून Transitive (सकर्मक) असलेले Infinitive वापरलेले असते.

have/has/had + infinitive ची रचना

have/has/had + infinitive या रचनेच्या वाक्याचा Passive Voice करण्यासाठी ज्या Object ची आवश्यकता असते, ते Object हे नेहमी वाक्यातील Infinitive ला जोडून वापरलेले असते.

या वाक्याची रचना पुढीलप्रमाणे असते.

Subject + have / has / had + Infinitive + Object
Passive Voice ची रचना करण्याचे नियम

have/has/had + infinitive या रचनेच्या Active Voice मधील वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी पुढील नियम वापरावेत.

नियम १ (पहिले स्थान)

पहिल्या स्थानी वाक्यातील Infinitive चे Object लिहावे.

Object म्हणून जर एखादे Noun वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.

परंतु, Object म्हणून जर Accusative Case चे Pronoun वापरलेले असेल, तर त्याचे रूपांतर Nominative Case च्या Pronoun मध्ये पुढीलप्रमाणे करावे.

Accusative Case चे Pronoun Nominative Case चे Pronoun
me I
us We
you You
him He
her She
it It
them They
नियम २ (दुसरे स्थान)

दुसऱ्या स्थानी have / has / had यांपैकी योग्य ते verb लिहावे.

वाक्यात जर had वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.

मात्र, have किंवा has वापरलेले असेल, तर Active Voice च्या वाक्यातील Infinitive  चे Object  लक्षात घेऊन योग्य ते verb पुढीलप्रमाणे वापरावे.

Object Verb
him has
her
it
Singular Number Noun
me have
us
you
them
Plural Number Noun
नियम ३ (तिसरे स्थान)

तिसऱ्या स्थानी to be लिहावे.

नियम ४ (चौथे स्थान)

चौथ्या स्थानी Infinitive चे Past Participle म्हणजे तिसरे रूप लिहावे.

नियम ५ (पाचवे स्थान)

पाचव्या स्थानी वाक्यातील Infinitive च्या Object नंतरचे उरलेले शब्द लिहावेत.

नियम ६ (सहावे स्थान)

सहाव्या स्थानी by हे Preposition लिहावे.

नियम ७ (सातवे स्थान)

सातव्या स्थानी वाक्यातील Subject लिहावा.

Subject म्हणून जर एखादे Noun वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.

परंतु, Subject म्हणून जर Nominative Case चे Pronoun वापरलेले असेल, तर त्याचे रूपांतर Accusative Case च्या Pronoun मध्ये पुढीलप्रमाणे करावे.

Nominative Case चे Pronoun Accusative Case चे Pronoun
I me
We us
You you
He him
She her
It it
They them
For example (उदाहरणार्थ),
Example 1
Active Voice He has to ask them about the theft.
Passive Voice They have to be asked about the theft by him.
Example 2
Active Voice My parents had to send me to England for higher studies.
Passive Voice I had to be sent to England for higher studies by my parents.
Example 3
Active Voice I have to discuss a delicate problem with you.
Passive Voice A delicate problem has to be discussed with you by me.
Example 4
Active Voice The municipality has to improve all the roads in the next month.
Passive Voice All the roads have to be improved in the next month by the municipality.
Example 5
Active Voice Students have to wear uniforms in the school.
Passive Voice Uniforms have to be worn in the school by students.

This article has been first posted on and last updated on by