Active Passive Voice आणि Past Continuous Tense चा Active Voice हे विषय आधी समजून घ्यावेत, जेणेकरून Past Continuous Tense चा Passive Voice समजून घेणे अधिक सोपे होईल.

Past Continuous Tense मधील Passive Voice – विषय सूची
Past Continuous Tense चा “Passive Voice”

इंग्रजी व्याकरणामधील Passive Voice (पॅसिव्ह वॉईस्) म्हणजे कर्मणी प्रयोग होय.

ज्या वाक्यात was being किंवा were being यांपैकी एखादे To be चे Verb वापरलेले असते आणि त्याच्यासोबत त्याला जोडून एखादे Past Participle वापरलेले असते, त्या वाक्याला Passive Voice चे Past Continuous Tense चे वाक्य असे म्हणतात.

Passive Voice ची रचना

इंग्रजी वाक्याच्या तिसऱ्या स्थानी वापरलेल्या Object ला कधीही दुसऱ्या स्थानी वापरलेल्या Verb ने सूचित होणारी क्रिया करता येत नाही.

मात्र, जेव्हा इंग्रजी वाक्यातील Object वाक्याच्या पहिल्या स्थानी वापरलेले असते आणि अशा वाक्याचा Subject हा वाक्याच्या तिसऱ्या स्थानी वापरलेला असतो, तेव्हा त्या वाक्याला Passive Voice चे म्हणजेच कर्मणी प्रयोगाचे वाक्य असे म्हणतात.

जेव्हा Present Continuous Tense मधील Passive Voice च्या वाक्याचे रूपांतर Active Voice मध्ये करावयाचे असते, तेव्हा त्या वाक्याचे पुढील घटक लक्षात घ्यावे लागतात.

Subject + was being / were being + Past Participle + by + Noun / Pronoun
Passive Voice च्या वाक्यातील doer

Passive Voice च्या रचनेमध्ये वाक्याच्या शेवटी सामान्यतः by हे Preposition आणि त्याला जोडून एखादे Noun किंवा Accusative Case चे Pronoun वापरलेले असते.

Passive Voice च्या वाक्यातील by + Noun / Pronoun या शब्दसमूहाला doer (डूअर) असे म्हणतात.

For example (उदाहरणार्थ),
  • Cricket was being played regularly by them.
  • त्यांच्याकडून नियमितपणे क्रिकेट खेळले जात होते.

वरील वाक्यामध्ये was being या to be च्या verb ला जोडून played हे Past Participle (तिसरे रूप) वापरलेले आहे.

वाक्याच्या पहिल्या स्थानी Cricket हे Common Noun वापरलेले आहे.

तसेच, वाक्याच्या शेवटी by  या Preposition ला जोडून them हे Accusative Case चे Pronoun वापरलेले आहे.

वाक्याचा Subject वाक्यातील क्रिया करण्यामध्ये Passive म्हणजे निष्क्रिय असल्यामुळे हे वाक्य Passive Voice चे म्हणजे कर्मणी प्रयोगाचे समजावे.

Doer विषयी विशेष टीप

Passive Voice च्या वाक्याचे रूपांतर Active Voice मध्ये करण्यासाठी वाक्यातील doer ची आवश्यकता असते. मात्र, कधीकधी वाक्यात doer वापरलेला असतो आणि कधीकधी doer वापरलेला नसतो.

जेव्हा वाक्यामध्ये doer वापरलेला नसतो, त्यावेळी वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य तो doer गृहीत धरावा लागतो.

Active Voice ची रचना करण्याचे नियम

Past Continuous Tense मधील Passive Voice च्या वाक्याचे Active Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी पुढील नियम वापरावेत.

नियम १ (पहिले स्थान)

पहिल्या स्थानी वाक्यातील doer लिहावा. मात्र, by लिहून नये.

Doer म्हणून जर एखादे Noun वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.

परंतु, doer म्हणून जर Accusative Case चे Pronoun वापरलेले असेल, तर त्याचे रूपांतर Nominative Case च्या Pronoun मध्ये पुढीलप्रमाणे करावे.

Accusative Case चे Pronoun Nominative Case चे Pronoun
me I
us We
you You
him He
her She
it It
them They
नियम २ (दुसरे स्थान)

दुसऱ्या स्थानी was किंवा were यांपैकी योग्य ते Auxiliary Verb लिहावे.

Passive Voice च्या वाक्यातील doer लक्षात घेऊन योग्य ते Auxiliary Verb पुढीलप्रमाणे वापरावे.

Doer To be चे Verb
me was
him
her
it
Singular Number Noun
us were
you
them
Plural Number Noun
नियम ३ (तिसरे स्थान)

तिसऱ्या स्थानी Passive Voice च्या वाक्यातील Past Participle च्या पहिल्या रूपाला ing प्रत्यय लावून त्याचे Present Participle लिहावे.

नियम ४ (चौथेे स्थान)

चौथ्या स्थानी Passive Voice च्या वाक्यातील Subject लिहावा.

Subject म्हणून जर एखादे Noun वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.

परंतु, Subject म्हणून जर Nominative Case चे Pronoun वापरलेले असेल, तर त्याचे रूपांतर Accusative Case च्या Pronoun मध्ये पुढीलप्रमाणे करावे.

Nominative Case चे Pronoun Accusative Case चे Pronoun
I me
We us
You you
He him
She her
It it
They them
नियम ५ (पाचवे स्थान)

पाचव्या स्थानी वाक्यातील उरलेले शब्द लिहावेत. मात्र, being आणि by  लिहू नयेत.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
Passive Voice Yudhishthira was being asked questions by the Yaksha.
Active Voice The Yaksha was asking Yudhishthira questions.

वरील Passive Voice च्या वाक्यामध्ये was being  या to be च्या verb ला जोडून helped  हे Past Participle (तिसरे रूप) वापरलेले आहे.

तसेच, वाक्याच्या शेवटी by  या Preposition ला जोडून Yaksha  हे Noun वापरलेले आहे.

वाक्याचा Subject वाक्यातील क्रिया करण्यामध्ये Passive म्हणजे निष्क्रिय असल्यामुळे हे वाक्य Passive Voice चे म्हणजे कर्मणी प्रयोगाचे समजावे.

या वाक्याचे Active Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.

Example 2
Passive Voice Mary was being convinced of her wrong attitude towards vaccination.
Active Voice The doctor was convincing Mary of her wrong attitude towards vaccination.

वरील Passive Voice च्या वाक्यामध्ये was being  या to be च्या verb ला जोडून convinced  हे Past Participle (तिसरे रूप) वापरलेले आहे.

या वाक्यामध्ये doer वापरलेला नसल्यामुळे Active Voice ची रचना करताना वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन doctor हा doer गृहीत धरलेला आहे.

वाक्याचा Subject वाक्यातील क्रिया करण्यामध्ये Passive म्हणजे निष्क्रिय असल्यामुळे हे वाक्य Passive Voice चे म्हणजे कर्मणी प्रयोगाचे समजावे.

या वाक्याचे Active Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.

Example 3
Passive Voice Water was being drunk from the river by animals.
Active Voice Animals were drinking water from the river.

वरील Passive Voice च्या वाक्यामध्ये was being  या to be च्या verb ला जोडून drunk  हे Past Participle (तिसरे रूप) वापरलेले आहे.

तसेच, वाक्याच्या शेवटी by  या Preposition ला जोडून animals  हे Noun वापरलेले आहे.

वाक्याचा Subject वाक्यातील क्रिया करण्यामध्ये Passive म्हणजे निष्क्रिय असल्यामुळे हे वाक्य Passive Voice चे म्हणजे कर्मणी प्रयोगाचे समजावे.

या वाक्याचे Active Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.

Example 4
Passive Voice Grapes were being sold along the roadside by the fruit vendor..
Active Voice The fruit vendor was selling grapes along the roadside.
Example 5
Passive Voice The customer's shoes were being polished by him.
Active Voice He was polishing the customer's shoes.
Example 6
Passive Voice He was being approached by the policemen.
Active Voice The policemen were approaching him.
Example 7
Passive Voice The strategic area was being held by the third battalion.
Active Voice The third battalion was holding the strategic area.
Example 8
Passive Voice A golden deer was being pursued in the forest by Ram.
Active Voice Ram was pursuing a golden deer in the forest.
Example 9
Passive Voice Seeds were being planted by the little girl.
Active Voice The little girl was planting seeds.

This article has been first posted on and last updated on by