टीप १

ज्या वाक्यात shall have been / will have been यांपैकी एखादे To be चे Verb वापरलेले असते आणि त्याच्यासोबत त्याला जोडून Past Participle वापरलेले असते, त्या वाक्याला Passive Voice चे म्हणजे कर्मणी प्रयोगाचे Future Perfect Tense चे वाक्य असे म्हणतात.

टीप २

ही Passive Voice ची रचना असल्यामुळे अशा वाक्यामध्ये सामान्यतः by हे Preposition वापरलेले असते आणि त्याला जोडून एखादे Common Noun / Proper Noun / Accusative Case चे Pronoun वापरलेले असते.

टीप ३

by + Common Noun / Proper Noun / Accusative Case चे Pronoun याला Doer (डूअर) असे म्हणतात.

टीप ४

Passive Voice च्या रचनेमध्ये कधीकधी वाक्यात doer वापरलेला असतो आणि कधीकधी doer वापरलेला नसतो.

जेव्हा वाक्यामध्ये doer वापरलेला नसतो, त्यावेळी वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य तो doer गृहीत धरावा लागतो.

या वाक्याचे Active Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी पुढील नियम वापरावेत.

नियम १

प्रथम वाक्याचा doer लिहावा.

नियम २

doer म्हणून जर Common Noun किंवा Proper Noun वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.

परंतु, doer म्हणून जर Accusative Case चे Pronoun वापरलेले असेल, तर त्याचे रूपांतर Nominative Case च्या Pronoun मध्ये पुढीलप्रमाणे करावे.

Accusative Case चे Pronoun Nominative Case चे Pronoun
me I
us We
you You
him He
her She
it It
them They
नियम ३

दुसऱ्या स्थानी will have हे Auxiliary Verb (सहाय्यक क्रियापद) लिहावे.

नियम ४

तिसऱ्या स्थानी वाक्यातील Past Participle लिहावे.

नियम ५

चौथ्या स्थानी Passive Voice च्या वाक्याचा Subject लिहावा.

नियम ६

Subject म्हणून जर Common Noun किंवा Proper Noun वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.

परंतु, Subject म्हणून जर Nominative Case चे Pronoun वापरलेले असेल, तर त्याचे रूपांतर Accusative Case च्या Pronoun मध्ये पुढीलप्रमाणे करावे.

Nominative Case चे Pronoun Accusative Case चे Pronoun
I me
We us
You you
He him
She her
It it
They them
नियम ७

पाचव्या स्थानी Passive Voice च्या वाक्यातील उरलेले शब्द लिहावेत.

मात्र, been आणि by लिहू नयेत.

For Example (उदाहरणार्थ)
 • Passive
  The strike will have been called off tomorrow by the union.
 • Active
  The union will have called off the strike tomorrow.
 • Passive
  This place will have been left in a few days by us.
 • Active
  We will have left this place in a few days.
 • Passive
  The workers will have been given an increase in their salaries.
 • Active
  The company will have given the workers an increase in their salaries.
 • Passive
  A new law will have been passed in the next month.
 • Active
  The government will have passed a new law in the next month.
 • Passive
  All the important papers will have been laid on the table by him.
 • Active
  He will have laid all the important papers on the table.

This article has been first posted on and last updated on by