Analysis of Complex Sentence (Clauses)


मिश्र वाक्याचे पृथक्करणAnalysis of Complex Sentence – विषय सूची
इंग्रजी व्याकरणातील ‘Complex Sentence’

इंग्रजी व्याकरणामधील Complex Sentence (कॉम्प्लेक्स सेन्टेन्स) हे दोन वेगवेगळ्या वाक्यांचे एक जोडवाक्य असते. या जोडवाक्याला मराठीमध्ये मिश्र वाक्य असे म्हणतात.

Complex Sentence मधील ही दोन वेगवेगळी वाक्ये एकत्र जोडण्यासाठी एकतर Subordinating Conjunction वापरले जाते किंवा त्यासाठी एखाद्या Relative Pronoun चा उपयोग केला जातो.

‘Main Clause’ आणि ‘Subordinating Clause’

Complex Sentence मधील Subordinating Conjunction किंवा Relative Pronoun ने सुरू होणाऱ्या वाक्याला गौणवाक्य असे म्हणतात, तर उरलेल्या दुसऱ्या वाक्याला मुख्यवाक्य असे म्हणतात.

गौणवाक्याला इंग्रजी व्याकरणामध्ये Subordinating Clause (सबॉर्डिनेटिंग् क्लॉज्) असे म्हणतात.

तसेच, मुख्यवाक्याला इंग्रजी व्याकरणामध्ये Main Clause (मेन क्लॉज्) किंवा Principal Clause (प्रिन्सिपल क्लॉज्) असे म्हणतात.

Subordinating Clause ची रचना

Subordinating Clause (सबॉर्डिनेटिंग् क्लॉज्) म्हणजे गौणवाक्य होय. अशी रचना नेहमी एखाद्या Complex Sentence मध्ये वापरलेली असते.

For example (उदाहरणार्थ),
  • They asked me where I live.
  • त्यांनी मला विचारले की मी कुठे राहतो.

वरील वाक्यामध्ये ‘They asked me’ आणि ‘I live’ या दोन वाक्यांना जोडण्यासाठी where (व्हेअर) हे Subordinating Conjunction वापरलेले आहे. त्यामुळे, या संपूर्ण जोडवाक्याला Complex Sentence म्हणजेच मिश्र वाक्य समजावे.

या वाक्याचे पृथक्करण केल्यास वाक्याची पुढीलप्रमाणे विभागणी करता येते –

Main Clause: They asked me
Subordinating Clause: where I live
Subordinating Conjunction: where

इंग्रजी व्याकरणातील Clauses हा विषय समजून घेण्यासाठी त्याची विभागणी पुढीलप्रमाणे केलेली आहे.

Noun Clause

Noun Clause(नाऊन क्लॉज्) म्हणजे नामवाचक गौणवाक्य होय.

इंग्रजी व्याकरणामध्ये जे गौणवाक्य Noun म्हणून वापरले जाते, त्याला Noun Clause असे म्हणतात.

Noun Clause ची विभागणी वेगवेगळ्या सहा प्रकारांमध्ये केलेली आहे.

Read more about Noun Clause
Adjective Clause

Adjective Clause(ऍड्जेक्टिव्ह क्लॉज्) म्हणजे विशेषणवाचक गौणवाक्य होय.

इंग्रजी व्याकरणामध्ये जे गौणवाक्य Adjective म्हणून वापरले जाते, त्याला Adjective Clause असे म्हणतात.

Adjective Clause मध्ये Relative Pronoun चा उपयोग केलेला असतो.

Read more about Adjective Clause
Adverb Clause

Adverb Clause(ऍड्व्हर्ब क्लॉज्) म्हणजे क्रियाविशेषणवाचक गौणवाक्य होय.

इंग्रजी व्याकरणामध्ये जे गौणवाक्य Adverb म्हणून वापरले जाते, त्याला Adverb Clause असे म्हणतात.

Adverb Clause ची विभागणी वेगवेगळ्या आठ प्रकारांमध्ये केलेली आहे.

Read more about Adverb Clause

This article has been first posted on and last updated on by