नियम १

इंग्रजी वाक्यातील पहिले स्थान हे नेहमी वाक्याच्या Subject (सब्जेक्ट) चे म्हणजेच कर्त्याचे असते.

नियम २

याला Subject (कर्ता) म्हणण्याचे कारण असे की कर्ता म्हणून वापरलेला शब्द / शब्दसमूह हा दुसऱ्या स्थानातील Verb ने सूचित होणारी क्रिया करत असतो.

नियम ३

दुसऱ्या स्थानातील Verb ने सूचित होणारी क्रिया करण्यामध्ये वाक्याचा Subject मग्न असल्यामुळे त्याला Active असे म्हणतात.

येथे Active या शब्दाचा अर्थ सक्रीय किंवा कार्यात मग्न असा समजावा.

त्यामुळे अशा वाक्याला इंग्रजी व्याकरणामध्ये Active Voice चे म्हणजेच कर्तरी प्रयोगाचे वाक्य असे म्हणतात.

नियम ४

इंग्रजी वाक्याचा Subject हा नेहमी Nominative Case म्हणजे प्रथमा विभक्तीचा समजला जातो.

नियम ५
Imperative Sentence चा Subject

कोणत्याही Imperative Sentence (आज्ञार्थी वाक्य) मध्ये वाक्याचा Subject हा गृहीत धरलेला असतो.

अशा वाक्यामध्ये वाक्याचा Subject स्पष्टपणे (explicitly) लिहिण्याची आवश्यकता नसते.

उदाहरणार्थ –
  • Thank you.

वरील वाक्य I thank you अशा स्वरूपाचे असून त्यामध्ये I हा वाक्याचा Subject आहे.

हे वाक्य Imperative Sentence असल्यामुळे वाक्याचा Subject गृहीत धरलेला असून तो स्पष्टपणे लिहिण्याची आवश्यकता नाही.

नियम ६
Exclamatory Sentence चा Subject

कोणत्याही Exclamatory Sentence (उद्गारार्थी वाक्य) मध्ये वाक्याचा Subject हा गृहीत धरलेला असतो.

अशा वाक्यामध्ये वाक्याचा Subject स्पष्टपणे (explicitly) लिहिण्याची आवश्यकता नसते.

उदाहरणार्थ –
  • Well done!

वरील वाक्य That was well done अशा स्वरूपाचे असून त्यामध्ये That हा वाक्याचा Subject आहे.

हे वाक्य Exclamatory Sentence असल्यामुळे वाक्याचा Subject गृहीत धरलेला असून तो स्पष्टपणे लिहिण्याची आवश्यकता नाही.

नियम ७

वाक्याचा Subject हा सामान्यतः पुढीलपैकी एखाद्या स्वरूपाचा असतो –

This article has been first posted on and last updated on by